नाशिक महानगरपालिका - NMC
नाशिकमध्ये पाण्याची टाकी कोसळून तीन मजूर जागीच ठार, तर २ जखमी
नाशिक : नाशिकमध्ये गंगापूर रोडवरील सोमेश्वर कॉलनी येथे अपना घर या प्रकल्पाचे काम सुरु असताना आज सकाळी १० वाजताच्या सुमारास पाण्याची टाकी कोसळून झालेल्या दुर्घटनेत तीन मजूर जागीच ठार झाले. या दुर्घटनेत दोन मजूर गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपना घर या प्रकल्पाचे काम सुरु असून येथे काम करणारे मजूर येथेच राहतात. आज सकाळी दहा मजूर प्रकल्पाच्या ठिकाणी असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ अंघोळ करत होते. काही कामगार ब्रश करत होते, तर काही कपडे धूत होते. यावेळी अचानक पाण्याची टाकी कोसळल्याने त्यात पाच कामगार दबले गेले. या दुर्घटनेत एकूण तीन कामगार जागीच ठार झाले, तर दोघे गंभीर जखमी झाले.याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.