Maharashtra GovPoliticsमुंबई

शरद पवारांच्या उपस्थितीत माजी आमदारांचा राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश

मुंबई : चक्रीवादळासोबतच राजकीय वादळही पाहायला मिळत आहे. दोन माजी आमदारांनी आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. मागील विधानसभा निवडणुकीपु्र्वी राष्ट्रवादीतील अनेक दिग्गज नेत्यांनी पक्षातून पळ काढल्याने राष्ट्रवादीत बोटावर मोजण्याइतकेच नेते राहतात की काय अशी स्थिती निर्माण झाली होती. परंतू निवडणुकीनंतर राजकीय चित्र पालटले व मोजक्या नेत्यांना घेऊन राष्ट्रवादी सत्तेत आली. त्यानंतर आज वंचित बहुजन आघाडीच्या दोन माजी आमदारांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

‘वंचित बहुजन आघाडी’चे माजी आमदार बळीराम शिरस्कर आणि हरिदास भदे यांनी शरद पवारांच्या उपस्थितीत आज राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

बळीराम शिरस्कर हे ‘वंचित’च्या तिकिटावर अकोल्यातील बाळापूरमधून आमदार होते. काही महिन्यांपूर्वी त्यांनी वंचित बहुजन आघाडीला राजीनामा दिला होता. तर अकोला पूर्वचे माजी आमदार हरिदास भदे यांनीही काही महिन्यांपूर्वी वंचित बहुजन आघाडीला रामराम ठोकला होता. बळीराम शिरस्कर आणि हरिदास भदे यांनी राष्ट्रवादीचे राहुल डोंगरे यांच्या पुढाकाराने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button