कोल्हापूर

पावनगडावर सापडला शिवकालीन तोफगोळा !

कोल्हापूर: महाराष्ट्राचे किल्ले हे मराठी मावळ्यांचे शौर्य दाखवतात. छत्रपती शिवाजी महाराज यांची शौर्यता दाखवली तर ती शब्दात अपुरी पडेल असे बोलायला हरकत नाही. कोल्हापूरच्या पावन गडावर शिवकालीन एतिहासिक ठेवा सापडला आहे.पावन गडावर शेकडोंच्या संख्यने तोफगोळे सापडले असून आणखी हजारो तोफगोळे असण्याची शक्यता आहे. माहितीनुसार, असे समजते कि दिशादर्शक फलक लावताना हे तोफेचे गोळे सापडले आहेत.

छ्त्रपती शिवाजी महाराज यांनी स्वतः पावन गडाची निर्मिती केली होती. वनविभाग आणि टीम पावनगड यांच्या सांगण्यानुसार एकूण ४०६ तोफगोळे हे सापडले आहेत. त्यांना हे गडावर दिशादर्शक फलक लावताना, फलकासाठी खड्डा करताना महादेव मंदिराशेजारी सापडले. स्थानिक रहिवासी याबाबत सांगताना असे बोलतात कि तिथे शिवकालीन दारू गोळ्याचे कोठार होते.
इतिहास अभ्यासक आणि सदस्य प्राधिकरण राम यादव यांनी असे म्हंटले आहे कि राज्य शासनाने गडकिल्ले संवर्धन करून त्यांना पुरातत्व विभागाच्या ताब्यात द्यायला पाहिजे ज्यामुळे राष्ट्राच्या संपत्तीचे जतन आणि संरक्षण होईल.

महाराष्ट्रात एखाद्या किल्ल्यावर एवढ्या मोठ्या प्रमाणात तोफगोळे मिळणे असा प्रकार पहिल्यांदाच घडला आहे. याला जगसमोरआणण्याची गरज आहे जेणेकरून भारताचा इतिहास जगासमोर येईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button