FoodsMaharashtra Govआरोग्य

नागरिकांसाठी FDA ची मोठी सुविधा; आता आवाजातूनही नोंदवता येणार तक्रार

महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (FDA) नागरिकांसाठी अत्याधुनिक AI आधारित ऑनलाइन तक्रार प्रणाली सुरू केली आहे. भेसळयुक्त अन्नपदार्थ, बनावट किंवा निकृष्ट दर्जाची औषधे याबाबत आता नागरिकांना मराठी, हिंदी किंवा इंग्रजी भाषेत सहज तक्रार नोंदवता येणार आहे. विशेष म्हणजे आर्टिफिशिल इंटेलिजेंस (AI) तंत्रज्ञानाच्या मदतीने तक्रार स्पष्ट आणि संपूर्ण स्वरूपात तयार होणार असून तिच्या स्थितीचाही ऑनलाइन मागोवा घेता येणार आहे.

अन्न आणि औषध तक्रारींसाठी एकच डिजिटल व्यासपीठ

FDA ने सुरू केलेल्या नव्या पोर्टलवर अन्न सुरक्षा आणि औषध सुरक्षा या दोन्ही प्रकारच्या तक्रारी एकाच ठिकाणी नोंदवता येणार आहेत. नागरिकांना वेगवेगळ्या कार्यालयांमध्ये जाण्याची आवश्यकता नसून ऑनलाइन पद्धतीने तक्रार सादर करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

AI करणार तक्रार तयार करण्यास मदत

तक्रारदाराने आपली समस्या मराठी, हिंदी किंवा इंग्रजी भाषेत सांगितल्यानंतर AI तंत्रज्ञान त्या माहितीचे व्यवस्थित तक्रारीत रूपांतर करणार आहे. त्यामुळे तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया अधिक सोपी, अचूक आणि पारदर्शक होणार असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.

तक्रारीची स्थितीही करता येणार ट्रॅक

नागरिकांना complaints.mahafda.in या संकेतस्थळावर जाऊन तक्रार नोंदवू शकतात. तक्रार सादर केल्यानंतर तिची सद्यस्थिती, चौकशी आणि कारवाईबाबतची माहितीही ऑनलाइन ट्रॅक करता येणार आहे.

अन्न असो किंवा औषध, फक्त बोला
तक्रार आपोआत तयार होईल

अधिक माहितीसाठी https://t.co/oZRYDkDaRX या संकेतस्थळाला भेट द्या. pic.twitter.com/OTr32pFXdg— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) July 15, 2026

भेसळ आणि बनावट औषधांविरोधात FDA ची डिजिटल मोहीम

राज्यात भेसळयुक्त अन्नपदार्थ, बनावट औषधे आणि निकृष्ट दर्जाच्या उत्पादनांविरोधात कारवाईला अधिक गती देण्यासाठी ही प्रणाली सुरू करण्यात आली आहे. नागरिकांचा सहभाग वाढवून ग्राहक सुरक्षेला बळकटी देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असल्याचे सांगितले जात आहे.

Related Articles

Back to top button