मुंबईत 2 किलो मिटरच्या प्रवासासाठी ऍम्ब्युलन्सने घेतले चक्क 8000 हजार रुपये
मुंबई : मुंबईत एका रुग्णाला हॉस्पिटलला जाण्यासाठी अम्बुलन्सची गरज होती. दोनशे मिटर म्हणजे दोन किलोमिटर अंतरवार असलेल्या हॉस्पीटलला सोडण्यासाठी खासगी अम्बुलन्सने चक्क 8000 हजार रुपये घेतले. रुग्णाच्या नातेवाईकाने ड्रायव्हरने आठ हजार रुपये घेतलेला व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.
सोमवारी कुर्ला येथील रहिवासी कबीरुन निसा यांना कोरोनव्हायरसच्या संसर्गाची लक्षणे आढळून आल्यानंतर हबीब रुग्णालयात दाखल केले. दुसर्याच दिवशी निसा या मध्यमवयीन रूग्णाच्या तक्रारी सकारात्मक आल्यानंतर येथे कोरोनावर उपचाराच्या सोयी नाही तिला दुस-या रुग्णालयात नेण्यास सांगितले होते.
“नातेवाईकाने जस्ट डायलला फोन केला आणि सरकारी रुग्णवाहिका उपलब्ध नसल्यामुळे खासगी रुग्णवाहिकांची चौकशी केली. त्यांना जरिमरी येथील रुग्णवाहिका सेवेच्या केअरशी संपर्क साधण्याचे निर्देश देण्यात आले. त्यानंतर त्यांनी रुग्णवाहिका पाठविली आणि दहा हजार रुपये घेतील असे सांगितले.” मोहम्मद मुदस्सर शेख, याने सांगितले.
शेख म्हणाले की, रुग्णाला ऑक्सिजनची आवश्यकता आहे आणि नियमित वाहन धोकादायक असल्याने त्याने त्या ऍम्ब्युलन्ससोबत भावबाजी करून दहा चे आठ हजार केले आणि रुग्णालयात नेले. निसाला रुग्णवाहिकेत हबीब रुग्णालयातून २०० मीटर अंतरावर फौजिया रुग्णालयात आणण्यात आले. शेखने निसाला फौजिया रुग्णालयात दाखल केल्यानंतर ते रुग्णवाहिका चालकाला पैसे देण्यासाठी खाली आले. ” तो म्महणाले, मी त्याला थोडेसे कमी पैसे घेण्यास सांगितले. एवढेच नाही तर तुम्ही वापरलेल्या पीपीई किटचे पण पैसे देऊ, पण जरा कमी पैसे घ्या असे त्याने ड्रायव्हरला म्हटले. परंतू, त्याचा मालक आठ हजार रुपयांपेक्षा कमी घेणार नाही असे तो म्हणाल्याचे,” रुग्णाचा मेव्हणा शेखने सांगितले.

