मुंबई

बाबा रामदेव यांची पतंजली करणार स्वदेशी उत्पादनाची होम डिलिव्हरी

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनतेला खादी सारख्या स्वदेशी उत्पादनाची खरेदी करण्याचे आवाहन केले होते . मोदींच्या या घोषणेनंतर बाबा रामदेव याच्या पतंजली कंपनीने स्वदेशी उत्पादनाची होम डिलिव्हरी करण्याचा निर्णय घेतला आहे . पतंजली विशेष ई-कॉमर्स प्लेटफॉर्म तयार करीत आहे .

पंतप्रधान मोदींच्या ‘व्होकल फॉर लोकल’ या आवाहनाला प्रतिसाद म्हणून स्वदेशी वस्तूंचा पुरवठा करण्याचा आम्ही प्रयत्न करीत असल्याचे ते म्हणाले . बालकृष्ण म्हणाले, ”OrderMe फक्त स्वदेशी उत्पादनांसाठी आहे पुरवठा आणि समर्थन करेल. पतंजली सर्व स्थानिक किरकोळ विक्रेते आणि लहान दुकान मालकांशी संपर्क साधून स्वदेशी चळवळीला हातभार लावण्यासाठी प्रयत्न करीत आहे . जेणेकरून त्यांना आमच्या व्यासपीठावर स्वदेशी उत्पादने विकता येतील.

ई-कॉमर्स साइट,ऑर्डरमी वर पतंजली स्वतःचे आयुर्वेदिक उत्पादन उपलब्ध करून देण्यासोबतच भारतीय उत्पादनाची विक्री करणार आहेत . प्रस्तावित संकेतस्थळावर ऑर्डरच्या काही तासांतच फ्री होम डिलीवरी केली जाईल.पतंजली आयुर्वेदचे मुख्य कार्यकारी आचार्य बालकृष्ण यांनी या योजनेची माहिती दिली .

दरम्यान स्वदेश ह्या मुद्य्याचा मोठा गाजावाजा करत रामदेव बाबा यांनी पतंजली समूहाची स्थापना केली. स्वदेशचा नारा देत त्यांनी पतंजलीच्या माध्यमातून विविध उत्पादने बाजारात आणली. त्या उत्पादनांना भारतीय बाजारपेठांमध्ये चांगली पसंती मिळाली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button