खासदार रविंद्र वायकर यांच्या प्रयत्नांमुळे
मेट्रो लाईन ६ कनेक्टीव्हीटी तसेच सर्विस रस्त्यामधील बाधित सुमारे १४६ कुटुंबांचे जोगेश्वरीतच पुनर्वसन

- मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्राचे खासदार रविंद्र वायकर यांची एमएमआरडीए आयुक्त संजय मुखर्जी यांच्या समवेत पार पडलेल्या बैठीकीत घेण्यात आला निर्णय
- दक्षिण बाजूच्या सेवा रस्त्यांमध्ये एकूण ५६ व रस्त्याच्या उत्तर बाजूस एकूण ९३ कुटुंबे होणार बाधित
- हिलक्रिस्ट सोसायटी येथील एसडब्लूडीचे काम लवकरच पूर्ण
- मेट्रो लीईन ६ व मेट्रो लाईन ७ च्या जोगेश्वरी (पूर्व) स्टेशनपर्यंत जोडणीचे काम डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण.
मुंबई :
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्रातील एम.एम. आर. डी. ए निगडीत प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी खासदार रविंद्र वायकर तसेच एम.एम. आर. डी. एचे आयुक्त यांच्या समवेत पार पडलेल्या बैठीकीत एकूण २२ पेक्षा जास्त मुद्द्यावर चर्चा करून सकारात्म निर्णय घेण्यात आले. यात मेट्रो लाईन ६ कनेक्टीव्हीटी तसेच सर्विस रस्त्यावरील बाधीत सुमारे १४६ कुटुबांचे पुनर्वसन लवकरच जोगेश्वरीतच करण्याचा निर्णय घेण्यात आला. यात दक्षिण बाजूच्या सेवा रस्त्यांमध्ये एकूण ५६ व रस्त्याच्या उत्तर बाजूस एकूण ९३ कुटुंबे बाधित होणार आहेत. त्याचे पुनर्वसन करण्यासाठी खासदार तसेच आयुक्त यांनी तत्काळ एस.आर.एचे मुख्य सचिव यांच्याशी संवाद साधून जोगेश्वरीतील उपलब्ध पीएपी देण्याचे आश्वासन दिले. लकडावाला चाळ येथील एकूण ४२ स्मशान भूमीमध्ये बाधित झोपडीधारकान करिता ४२ पीएपीची मागणी एस.आर.ए कडे करण्यात आली आहे.

या बैठकीला एमएमआरडीए आयुक्त संजय मुखर्जी, विक्रम कुमार, अतिरिक्त जिल्हाधिकारी अमृत नाटेकर, भूषण चौधरीतसेच प्राधिकरणाच्या विविध विभागाचे अधिकारी, मुंबई महानगर पालिकेचे सोनावणे, विभाग प्रमुख राजू पेडणेकर, माजी नगरसेविका राजुल पटेल, अनिरुद्ध नारकर, शाखा प्रमुख बंटी सावंत,दीप्ती वायकर पोतनीस आदी पदाधिकारी तसेच रहिवाशी उपस्थित होते.
मेट्रो लाईन ६ श्याम नगर व महाकाली गुंफा स्टेशन :
श्याम नगर येथील तांत्रिक रूम इमारत तसेच एन्ट्री व एग्झीटच्या पायाभरणीचे काम सुरु असून इमारत बांधकाम डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. या स्टेशनच्या डाव्या बाजूस प्रस्तावित प्रवेश व तिकीट सेवा इमारतीसाठी सुमारे १००० चौरस मीटर जागा विकासक ओबेरॉय यांच्याकडून अधिग्रहण करण्याचे काम प्रगीतपथावर आहे. तसा प्रस्ताव नगरविकास विभागास मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. तसेच डाव्या बाजूच्या इमारतीसाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरु आहे. महाकाली गुंफा स्टेशन इमारतीचे काम पूर्ण झाले असून फिनिशिगचे काम प्रगतीपथावर असून ते ३० सेप्टेंबर २०२६ रोजी पूर्ण करण्यात येणार आहे.
मेट्रो ७ जोगेश्वरी जंक्शन येथे मेट्रो ६ व ७ ची कनेक्टीव्हीटी:
मेट्रो लाईन ६ च्या जेव्हीएलआर स्टेशन (जोगेश्वरी जंक्शन) ते मेट्रो लाईन ७ च्या जोगेश्वरी (पूर्व) स्टेशन पर्यंत जोडणीचे काम नियोजित असून हे काम डिसेंबर २०२६ प्रयत्न पूर्ण करण्यात येणार आहे. हि कामे पूर्ण झाल्यावर मेट्रोच्या पुलाखालील जागांचे सुशोभिकरण करण्यात येणार आहे. मेट्रो ६ च्या मार्गावर साउंड बॅरिअर लावण्यात येणार आहे.
मेट्रो लाईन ७ च्या ओबेरॉय मॉल येथील पादचारी पूल मोहन गोखले पथालगत उतरवणे :
विकासक ओबेरॉय यांनी येथील जिन्याचे काम ३ महिन्यात पूर्ण करण्याचे आश्वासन दिले असून तसे हमीपत्रही विकासकाने एम.एम.आर.डी.ए ला दिले आहे.
मेट्रो लाईन ६ व जोगेश्वरी रेल्वे स्टेशन कनेक्टीव्हीटी :
यासाठी ब्रिजच्या व्यवहार्यतेचा आढावा घेण्यात येत असून जोगेश्वरी रेल्वे स्थानक आणि मेट्रो लाईन ६ स्थानक यांना जोडणाऱ्या एफ.ओ.बी साठी संकल्पना आराखडा तयार करण्यात आला आहे.
मेट्रो लाईन ६ सिप्झ स्टेशन ते अक्वा–३ लाईन कनेक्टीव्हीटी:
मेट्रो लाईन ६ महाकाली स्टेशन ते सिप्झ मेट्रो स्टेशनपर्यंत तसेच आरे स्टेशन पर्यंत कनेक्टीव्हीटी करण्यासाठी आराखडा तयार करण्याचे काम सुरु आहे. या ठिकाणी भुयारी मार्ग अथवा पादचारी पूल बांधण्याचा एम.एम.आर.डी.एचा विचार आहे. मातोश्री स्पोर्ट्स क्लब, जोगेश्वरी येथील मेट्रो स्टेशनच्या ग्राईडिंग व फिनिशिंगचे काम सध्या प्रगतीपथावर असून ते ३० मे २०२६ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.
श्याम नगर ते पश्चिम द्रुतगती महामार्ग पर्यत सेवा रस्त्याचे काम :
या कामातील बाधिक्त झोपड्या हटवण्याची प्रकिया सुरु असून तेच उप प्रमुख अभियंता प.उ यांच्या मार्फत मार्फत या रास्याबाबत सल्लागार नेमण्यात आला असून अंदाजपत्र बनवून कंत्राटदार नेमण्याचे काम सुरु आहे. त्याच प्रमाणे जनशक्ती पोलीस चौकी ते लिंक रोड पर्यंत रस्ता बनवण्याचे कामहि लवकरच करण्यात येणार आहे.
बांद्रेकरवाडीतील मेट्रो ६ च्या कामातील त्या बाधितांना घरे मिळणार :
बांद्रेकरवाडी येथील मेट्रो रेल्वे ६ च्या कामात बाधित झालेल्या संरक्षित पात्र झोपडीधारकांना सिग्मा येथे घरे देण्यासाठीचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून उपमुख्यमंत्री यांच्या कार्यालयाकडे मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे. या अजित शिंदे, विजय रुद्रे, जितेंद्र पटेल, शांभवी लाड, शामरती त्यागी, मुकेश जैन यांना ७ दिवसात घरे देण्याच्या सूचना खासदार यांनी यावेळी दिल्या.
जोगेश्वरी विक्रोळी जोड रस्तावरील दुतर्फा रखडलेल्या ८०० मिलीमीटर व्यासाची मल: निस्सारण वाहिनी टाकण्याचे काम पूर्वी ज्या कंत्राटदाराकडे देण्यात आले होते त्याने ते नियोजित वेळात पूर्ण न केल्याने हे काम पूर्ण करण्यासाठी नव्याने निविदा काढण्याचे काम प्रगतीपथावर आहे. अंधेरी इएसआयसी नगर मेट्रो स्टेशनला ‘हरे राम हरे कृष्ण मंदिर स्थानक नाव देण्याच्या प्रस्तावाची फाईल अंतिम मंजुरीसाठी उपमुख्यमंत्री यांच्याकडे पाठवण्यात आली आहे. एस.आर.पी.एफ कॅम्प ते जोगेश्वरी विक्रोळी जोड रस्ता जंक्शन, पेप्सी गोडाऊन पर्यंत बॉक्सड्रेन बनवण्यासाठी प्रजन्य जल वाहिनी खात्याने एस.आर.पी.एफ गेट ते वालभट नदी येथे बॉक्सड्रेनचे काम प्रगतीपथावर आहे. मेट्रो लाईन ६ येथे हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे जोगेश्वरी पूर्व-पश्चिम (दक्षिण) दुर्गानगर पर्यंत जोडणाऱ्या उड्डाणपुलावर इन्फिनिटी मॉल, वीरा देसाई जंक्शन तसेच पूनम नगर परिसरात नॉईस बर्रीर ची तरतूद करण्यात आल्याची माहिती यावेळी संबंधित अधिकारी यांनी दिली आहे.


