जगातील काही लोक असे असतात जे कुठलंही काम करण्यात पारंगत असतात. तसेच, ते या कामाला इतकं सोपं बनवतात की ते बघणाऱ्यांना विश्वास करणं कठीण होतं. क्रिकेटच्या जगातही असा एक खेळाडू आहे जो मैदानैत उतरताच लोकांची दातखीळ बसते. तो असे शॉट लावतो ज्यांना बघून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का लागतो. जेव्हा तो फिल्डिंग करतो तेव्हा अशा प्रकारे कॅच पकडतो की जणू सुपरमॅनचं मैदानात उतरला आहे.
या खेळाडूने फक्त क्रिकेटमध्येच नाही तर गोल्फ, टेनिस आणि रग्बी सारख्या खेळातही कमाल केली आहे. 21 वर्षांच्या वयात या खेळाडूला देशाचं भविष्य म्हटलं जात होतं. या खेळाडूचं नाव अब्रामह बेंजामिन डिविलियर्स आहे. याला सारं जग एबीडीच्या नावाने ओळखते. 1983 मध्ये आजच्याच दिवशी म्हणजे 17 फेब्रुवारीला त्याचा जन्म झाला होता.
एबीने त्याच्या करिअरमध्ये कसोटीत दोन वेळा द्विशतक झळकावले आहेत. यातील एक पाकिस्तानविरुद्ध नोव्हेंबर २०१० मध्ये नाबाद २७८ धावा तर त्याआधी २००८ साली अहमदाबाद येथे भारताविरुद्ध नाबाद २१७ धावा केल्या होत्या. पाक विरुद्धची त्याची खेळी ही आफ्रिकेकडून झालेली सर्वोच्च धावसंख्या आहे.
2015 मध्ये या फलंदाजाने एक आश्चर्यकारक कारनामा केला. वेस्ट इंडिजविरोधात अवघ्या 31 चेंडूत एक दिवसीय शतक ठोकलं. यामध्ये त्याने 44 चेंडूत 149 धावा केल्या. सर्वात वेगवान अर्धशतक आणि शतक ठोकलेल्या एबीडीने सर्वात वेगवान 150 धावा करण्यापासून चुकला. एबीडीने फक्त 25 चेंडूत 132 धावा केल्या. या धावा एबीडीने 9 चौकार आणि रेकॉर्ड 16 षटकारच्या मदतीने बनवले. त्याचा स्ट्राईक रेट 338.64 होता.
काही महिन्यांनंतर विश्वचषकात त्याने फक्त 66 चेंडूत 162 धावा केल्या. त्यासोबतच सर्वात वेगवेन 150 धावांचा रेकॉर्ड आपल्या नावे केला. पण, दक्षिण आफ्रिका सेमीफायनलपर्यंतच पोहोचू शकला, फायनलमध्ये नाही पोहोचला. यावेळी एबीडीला अश्रू अनावर झाले आणि संपूर्ण जगाने सुपरमॅनला रडताना पाहिले.
एबीने आतापर्यंत ११४ कसोटी, २२८ वनडे आणि ७८ टी-२० मध्ये देशाचे प्रतिधित्व केले आहे. कसोटीत २२ शतक आणि ४६ अर्धशतकासह ८ हजार ७६५ धावा. तर वनडेत २५ शतक आणि ५३ अर्धशतकासह ९ हजार ५७७ धावा केल्या. टी-२० मध्ये त्याने १० अर्धशतकासह १ हजार ६७२ धावा केल्या आहेत. तर गोलंदाजी करताना ९ विकेट मिळवल्या आहेत.
२०१८ साली क्रिकेटमधून अचानक निवृत्ती जाहीर केल्यानंतर एबीने पुन्हा एकदा आफ्रिकेकडून खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या वर्षी भारतात होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपमध्ये तो खेळण्याची शक्यता आहे. यासंदर्भात अधिकृत घोषणा झालेली नाही. पण जर आफ्रिकेच्या बोर्डाने ठरवले तर हे होऊ शकते.
