Health & FitnessHealth & Fitnessमुंबई

अत्यावश्यक कर्मचारी कोरोना लसी बाबत शाशंक!

मुंबई: एकीकडे कोरोनाची लस आल्यामुळे लोक हे आनंदित आहेत तर दुसरीकडे याबाबत बर्याच शंका कुशंका सुद्धा आहेत. खुद्द आरोग्य कर्मचारी हे लस घेण्यासाठी शाशंक आहेत. लसीच्या परिणामाबाबत गैरसमज आणि अफवा यामुळे कर्मचार्यांकडून अजून योग्य प्रतिसात मिळत नसल्याचे निदर्शनास येते.

यामुळे लसीकरणाचे प्रमाण कमी आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण झाले तेव्हा त्याला फारसा प्रतिसात मिळाला नाही. हळूहळू भीती कमी होत गेली आणि दुसर्या टप्प्यात याची टक्केवार ८० ते ९० टक्क्यांपर्यंत पोचली. विशेषतः खासगी रुग्णालये यासाठी खूप उत्सुक आहेत.

लसीकरणाच्या दुसर्या टप्प्यात पालिका कर्मचारी रेल्वे, बेस्ट कर्माचारी यांची शुक्रवार पासून लसीकरण करण्यास सुरुवात केली. पण तरीही हळूहळू तिथेही प्रतिसाद मिळणे कठीण होत गेले. फक्त ७५३ जणांनीच लस घेतली. एकूण लसीकरणाचे नियोजन हे १,७५२ कर्मचाऱ्यांचे होते. शनिवारी याचा प्रतिसाद थोडा वाढला होता.

कर्मचारी वर्गाला ही शंका आहे की ही लस घेऊन किती दिवस सुरक्षितता मिळेल तसेच जर कमी काल मिळत असेल तर लस घेऊन काय फायदा असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. वरिष्ठ अधिकार्यांनी स्व:ताहून पुढे यावे जेणेकरून या शंकांचे निरसन होईल अशी मागणी ही कर्मचारी करतात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button