BJPMaharashtra Govमुंबई

महाराष्ट्र भाजप प्रदेश कार्यालयात फडणवीसांच्या हस्ते श्रीरामपूजा संपन्न

मुंबई : अयोध्या येथील श्री राम मंदिर भूमीपूजन सोहळ्यानिमित्त प्रभू श्री रामचंद्राच्या प्रतिमेचे पूजन,भजन,आरती,आनंदोत्सव कार्यक्रम भाजप प्रदेश कार्यालया विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील,राष्ट्रीय सह संघटन मंत्री व्ही सतीश, प्रदेश संघटन महामंत्री विजयराव पुराणिक यांची उपस्थिती होती.

रामनगरी अयोध्या येथे होणा-या ज्या ऐतिहासिक सोहळ्याकडे देशवासियांचे डोळे लागले आहेत, तो अयोध्या नगरीतील राम मंदिर भूमिपूजन सोहळा अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. हा उत्सव साजरा करण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून संत, महंत, भक्तगण अयोध्येत पोहोचले आहेत. अयोध्येला दिवाळीचे स्वरुप आले असून आज (बुधवार 5 ऑगस्ट) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दुपारी 12 वाजून 40 मिनिटांच्या मुहूर्तावर भूमिपूजन होणार आहे. यासाठी पंतप्रधान मोदी लखनऊमध्ये दाखल झाले असून काही वेळातच ते अयोध्येत पोहचतील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button