द रोल मॉडल ऑफ गुड डीड्स पुरस्काराने आमदार राजकुमार बड़ोले सम्मानीत – थाईलैंड येथील बुद्धिस्ट विद्यापीठाने केला गौरव
मुंबई, दि. ३०(प्रतिनिधी): थाईलैंड येथील महचुला बुद्धिस्ट विद्यापीठाच्या एमसीयु ने राज्याचे माजी सामाजिक न्यायमंत्री व विद्यमान आमदार राजकुमारजी बड़ोले यांचा काल दिनांक २९ ऑगस्ट रोजी द रोल मॉडल ऑफ गुड डीड्स हा पुरस्कार देऊन गौरव केला आहे . बैंकाक येथे त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.
आपल्या मंत्रिपदाच्या कारकिर्दीत राजकुमार बड़ोले यांनी दलित, शोषित, पीड़ित, मागस्वर्गीय आणि इतर समाजाच्या कल्याणासाठी भरीव कार्य केले. भारतरत्न परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सच्चा अनुयायी या नात्याने महाराष्ट्रात त्यांनी बुद्ध धम्माच्या प्रचार व प्रसारासाठी वेळोवेळी ऐतिहासिक भूमिका घेतली.
आमदार राजकुमार बड़ोले यांनी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री असतांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 125 वी जयंती राज्यात वर्षभर साजरी केली . वैशाख पौर्णिमेच्या दिवशी बुद्ध जयंतीचा कार्यक्रम ‘भूतो न भविष्यतो’ अशा थाटात मुंबईच्या गेट वे ऑफ इंडिया येथे दिमाखदार सोहळ्याद्वारे साजरा केला.

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरु केलेल्या मुकनायक पत्रिकेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधुन देशाच्या राजधानी दिल्ली येथे मुकनायक पुरस्कार घेण्याचे धाडस आमदार राजकुमार बड़ोले यांनी केले.
आमदार बड़ोले यांच्या कारकिर्दित लंडन येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या घरात विद्यार्थी दशेत वास्तव्य केले ते घर महाराष्ट्र सरकार ने विकत घेऊन त्याचे आंतरराष्ट्रीय स्मारकात रूपांतर केले यात राजकुमारजी बड़ोले यांचा सिंहाच्या वाटा होता हे विसरणे शक्य नाही.
पाली त्रिपिटकाचे मराठी भाषांतर करण्यासाठी सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातुन पुणे विद्यापीठाला रुपये 5 कोटी देण्याचे धाडस त्यांनी केले.
75 व्या महार बटालियनचा दिमाखदार सोहळा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितित त्यांनी मुंबईच्या गेट वे ऑफ इंडिया येथे घेऊन महार बटालियनच्या इतिहासाला ऊजाळा दिला.