Travelपुणेमुंबई

उद्या मुंबई – पुणे एक्स्प्रेस-वेला अर्ध्या तासाचा ब्रेक

मुंबई – पुणे एक्स्प्रेस-वे उद्या म्हणजेच २५ जून रोजी दुपारी एक ते दीड या दरम्यान दोन्ही बाजुंनी बंद करण्यात येणार आहे. पुणे-मुंबई मार्गावर परंदवाडी येथे महावितरणची केबल टाकण्यासाठी पूर्ण रस्ता बंद करणार असल्याची माहिती महामार्ग पोलिसांनी दिली. परंदवाडी ठिकाणी महावितरणची ओव्हरहेड हायटेंशन केबल तुटली असून तिचे काम प्रस्तावित असल्याचे महामार्ग पोलिसांनी सांगितले. या कामाच्या कालावधीमध्ये मुंबईहून पुण्याकडे आणि पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक अर्ध्यातासासाठी बंद करण्यात येणार आहे. मुंबईकडे जाणारी हलकी आणि प्रवासी वाहने ही किवळे पुलापासून जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरून वळवणार असून पुण्याकडे येणारी हलकी, चारचाकी व प्रवासी वाहने ही उर्से टोलनाका येथून जुन्या पुणे-मुंबई मार्गावर वळविण्यात येणार असल्याची माहिती महामार्ग पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button