Health & Fitness

भारत बायोटेक कंपनीकडून लवकरच कोरोना लशीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी

कोरोनाला थोपवण्यासाठी हैदराबाद स्थित भारत बायोटेक कंपनीकडून कोव्हॉक्सीन नावाची लस विकसित केली जात आहे. ही लस चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात पोहोचली आहे. लवकरच तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला सुरुवात होणार असून ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने परवानगी दिली आहे.

या तिसऱ्या टप्प्यातील चाचणी ही देशभरातील १८ ते १९ वेगवेगळ्या ठिकाणी केली जाणार आहे अशी माहिती उच्च स्तरीय सूत्रांकडून मिळाली आहे. या चाचणीसाठी साधारण २२ हजार स्वयंसेवक सहभागी होणार असल्याची माहिती मिळाली आहे. कंपनीने फेज एक आणि फेज दोन चाचणीचा डाटा तसेच प्राण्यांवरील चाचणीचा डाटा डीजीसीआयच्या तज्ज्ञांच्या समितीसमोर सादर केला. लशीची परिणामकारकतेचे मूल्यमापन करण्यासाठी तिसऱ्या फेजच्या चाचणीची परवानगी देण्यासाठी सुद्धा प्रस्ताव सादर केला. लस मानवी शरीरासाठी सुरक्षित आहे का ? हे तपासण्यासाठी तिसऱ्या फेजमध्ये हजारो स्वयंसेवकांवर चाचणी करण्यात येते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button