जगातील सर्वात श्रीमंत टी-२० लीग म्हणून भारतातील आयपीएल स्पर्धेकडे पाहिले जाते. भारताशिवाय ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज, पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेश सारख्या देशात टी-२० लीग स्पर्धा घेतल्या जातात. पण आयपीएल सारखे यश आणि लोकप्रियता अन्य लीग स्पर्धांना आली नाही. पण आता आयपीएलला मागे टाकणारी अशी एक स्पर्धा सुरू होणार आहे.अशातच आयपीएलच्या धर्तीवर इमिरेट्स क्रिकेट बोर्डाने आता आपली स्वत:ची टी-ट्वेन्टी सुरु करण्याची घोषणा केली आहे.
इमिरेट्स क्रिकेट बोर्डाने संभावित टी-ट्वेन्टी लीग यूएईमध्ये होणार असल्याचं सांगितलं आहे. तसंच या स्पर्धेत क्रिकेट जगतातले दिग्गज खेळाडू सहभागी होतील, अशी आशा इमिरेट्स क्रिकेट बोर्डाने व्यक्त केलीय. जसं भारतातल्या क्रिकेट रसिकांवर आयपीएलचं गारुड आहे तसं यूएईमधल्या क्रीडा रसिकांनाही टी-ट्वेन्टी क्रिकेट खूप आवडतं. यूईएमधल्या ग्राऊंडवर एखादी टी-ट्वेन्टी मॅच असली की तिथले स्थानिक प्रेक्षक मॅचसाठी तुफान गर्दी करतात.
इमिरेट्स क्रिकेट बोर्डाने जाहीर केले आहे की टी -20 लीगचा पहिला हंगाम यावर्षी होणार आहे. लीगचे आयोजन डिसेंबर 2021 ते जानेवारी 2022 या कालावधीत केले जाईल. या लीगला इमिरेट्स क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नहयान मुबारक अल नहयान यांचंही समर्थन आहे. यूएईने याअगोदरही स्थानिक पातळीवर टी-20 क्रिकेट स्पर्धाचं आयोजन केलं आहे.
युएईमध्ये होणाऱ्या या टी-२० लीग स्पर्धेसाठी क्रिकेट खेळणाऱ्या अनेक देशांनी उत्सुकता दाखवली आहे. विशेषत: भारतातील काही उद्योगपती आणि बॉलिवूड स्टार यांच्यासह आयपीएलमध्ये सध्याच्या संघ मालकांनी युएईमध्ये होणाऱ्या या टी-२० लीग स्पर्धेतील संघ विकत घेण्याची इच्छा व्यक्त केल्याचे बोर्डाचे सचिव मुबाशिर उस्मानी यांनी सांगितले. या लीग स्पर्धेच्या पहिल्या हंगामात सहा संघ असतील. त्याचे शेअरधारक कोण असतील याचा निर्णय एका महिन्यात घेतला जाणार आहे.
BREAKING: ECB announces EXCLUSIVE T20 league.
League sanctioned by ECB Chairman His Highness Sheikh Nahayan Mabarak Al Nahayan to Dubai Sports City, & touted for play December 2021 / January 2022.
More here https://t.co/6zphejjeW1 pic.twitter.com/LdrAIWx6KE
— UAE Cricket Official (@EmiratesCricket) February 9, 2021
