या प्रकारे तुम्ही तुमची निर्णय शक्ती वाढवू शकता !
कुठल्याही गोष्टीचा निर्णय घेणे ही तशी जरा अवघडच गोष्ट असते. अवघड का? कारण आपण बऱ्याच गोष्टी करताना बुचकळ्यात पडतो किंवा घाईघाईत चुकीने वागतो मग आपल्यालाच त्या गोष्टीचा त्रास होतो. निर्णय घेणे ही सुद्धा एक कलाच आहे. त्यासाठी अनुभव, सद्सद्विवेकबुद्धी आणि थंड डोके हे महत्वाचे असते. तुम्हाला निर्णय कुठल्याही बाबती घ्यायचा असतो, अगदी कुठले कपडे घ्यायचे असतील किंवा नोकरीबाबत असेल आपण आपल्या मनाचे ऐकतो आणि तसेच निर्णय घेतो.
१. ‘बेस्ट’ पर्यायासाठी वेळ वाया घालवू नका
आपण निर्णय घेताना कुठला पर्याय हा बेस्ट असायलाच पाहिजे असा नेहमी विचार करतो आणि या निर्णयात आपण आपला वेळ वाया घालवतो. मग या अडलेल्या निर्णयामुळे आपला वेळ निघून जातो आणि कामे पाठी राहतात. त्यामुळे स्वतःला वेळेचे बंधन घाला मग निर्णय घ्या. लंडन बिझेनेस स्कूल आणि युनिवर्सिटी ऑफ शिकागो यांनी काढलेल्या सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की, जे लोक बेस्ट पर्यायासाठी वेळ वाया घालवतात त्यांचे नुकसान जास्त होते. त्यामुळे उशीर न करणे हेच चांगले.
२. ‘ऐकावे जनाचे करावे मनाचे’
आपण स्वतःला नेहमी कमी लेखतो. दुसरा आपल्यापेक्षा चांगला अशी भावना आपल्या मनात असते. मग आपण निर्णय घेताना दुसर्याचा विचार, त्याचे अनुभव, त्याचा दृष्टीकोन हे सगळ विचारात घेऊन आपल्या अनुभव आणि विचारांना कमी लेखतो. पण एक लक्षात ठेवा दुसर्यांचे अनुभव तुमच्या फायद्याचे असतीलच असे नाही. तुमचा निर्णय हा तुम्हाला तुमच्या परिस्थितून घ्यायचा आहे. दुसर्याचे विचार ऐका पण स्व:ताच्या मनाची करा म्हणजेच ‘ऐकावे जनाचे करावे मनाचे’
३. व्यापक दृष्टी ठेवा !
निर्णय घेताना भविष्यात्मक दृष्टी ठेवा. ‘ Think Big’ या ओळी प्रमाणे व्यापक दृष्टी ठेवा. रावणासारखा विचार करा म्हणजेच एखाद्या गोष्टीचा १० वेगवेगळ्या पद्धतीने विचार करा. या गोष्टीला किती शक्यता असू शकतात हे विचारात घ्या.
४. प्रत्येकावर विश्वास ठेवू नका
विश्वासाशिवाय कुठलीही गोष्ट आपण करू शकत नाही. पण प्रत्येकावर विश्वास ठेवणे ही सुद्धा गोष्ट तितकीच चुकीची आहे. त्यामुळे जर अति महत्वाचे निर्णय घ्यायचे असतील तर ते कोणाला सांगू नका. कारण एक लक्षात ठेवा निर्णय हा तुम्ही घेणार आहात. त्यामुळे त्याची पूर्ण जबाबदारी ही तुमच्यावर असते. त्यामुळे स्वतःवर जास्त विश्वास ठेऊन निर्णय घ्या.