सिद्धीविनायक मंदिर न्यास बांधून देणार तीवरे गावातील दूर्घटनेत उध्वस्त झालेली घरं आणि शाळा – आदेश बांदेकर
सिद्धीविनायक मंदिर न्यास बांधून देणार तीवरे गावातील दूर्घटनेत उध्वस्त झालेली घरं आणि शाळा – आदेश बांदेकर – अध्यक्ष सिद्धीविनायक गणपती मंदिर न्यास (राज्यमंत्री दर्जा)
रत्नागिरी जिल्ह्यात चिपळुण तालुक्यातील तीवरे धरण फटून तीवरे गावातील अनेक घरं दूर्घटनाग्रस्तं झाली. अनेकांचे संसार उघ्वस्त झाले. आता याच गावातील दूर्घटनेत उध्वस्त झालेल्यांचे संसार सिद्धीविनायक मंदिर न्यास उभारणार आहे. तीवरे गावात ज्यांची घरं पडली त्यांची घरं पुन्हा नव्याने बांधून देणार.
श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाच्या आदेश बांदेकर यांच्या अध्यक्षतेत विश्वस्त मंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला इतकच नाही तर तीवरे गावातील शाळा देखील सिद्धीविनायक मंदिर न्यास बांधून देणार आहे. त्यासाठी भरीव निधीची तरतुद करून सदर प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे, त्यामुळे धरण फूटीने आभाळ कोसळलेल्या तीवरे ग्रामस्थांना, बाप्पाने आशिर्वाद दिलांय आयुष्याची नवी सुरवात करण्यासाठी.