कोल्हापूर : धनगर समाजाला देण्यात आलेल्या अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अमलबजावणी करा, या मागणीसाठी धनगर समाजाची पहिली गोलमेज परिषद 2 ऑक्टोबरला कोल्हापूर इथं आयोजित करण्यात येणार आहे. गोलमेज परिषदेला राज्यातील धनगर समाजाच्या विबिध संघटनाचे प्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याची माहिती समनव्य समितीचे निमंत्रक संदीप कारंडे यांनी दिली.
धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न गेली अनेक वर्षे प्रलंबित आहे. धनगर समाजाचा एकही लोकप्रतिनिधी लोकसभेत नाही, या समाजाच्या आरक्षणविषयी लोकसभेत कोणीही प्रश्न उपस्थित करत नाही. परिणामी कायद्यातील त्रुटी दूर करून धनगर समाजाच्या आरक्षणाची अमलबजावणी होत नाही. समाजातील अनेक घटक , विद्यार्थी याना शासकीय योजनांपासून वंचीत रहावे लागल आहे. धनगर समाजाच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी राज्यातील सर्व संघटना आता एकवटल्या आहेत. सर्व संघटनाच्या प्रतिनिधी आणि समाजबांधवांची गोलमेज परिषद 2 ऑक्टोबरला कोल्हापुरातील अक्षता मंगल कार्यालयात होणार आहे. या परिषदेला समाजाचे सर्व आजी माजी लोकप्रतिनिधी विविध संघटनाचे पदाधिकारी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
