FinanceMaharashtra Govमुंबई

‘क्रिप्टो ट्रेडर्स’ च्या खात्यांना मनाई नाही – रिझर्व्ह बँक

मुंबई : व्हर्च्युअल चलनांसह व्यवहार करणार्‍या व्यापा-यांना आता खाती देण्यास बॅंकांवर कोणतीही बंदी नसल्याचे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने गेल्या आठवड्यात क्रिप्टो चलन विनिमय युनोकॉइनला सांगितले. बँकिंग नियामक, युनोकॉईनचे सह-संस्थापक बी व्ही हरीश यांनी व्हर्च्युअल चलनांवर बंदी असल्याच्या पार्श्वभूमीवर माहितीच्या अधिकाराखाली हरीश यांनी विचारणा केली असता त्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना आता अशा व्यवहारांना बंदी नसल्याचे आरबीआयने म्हटले.

बिटकॉन सारख्य़ा आभासी चलनाला विरोध केल्यानंतर क्रिप्टो ट्रेडर्स खातेदेखील आभासी चलनात येत असल्याचे सांगत न्यायालयाने क्रिप्टो ट्रोडर्सच्या खात्यांना विरोध दर्शवला होता. यावरून युनोकॉईनचे सह-संस्थापक बी व्ही हरीश यांनी व्हर्च्युअल चलनाला बंदी का असा प्रश्न करत माहिती अधिकाराच्याखाली आरबीआयला विचारणा केली. त्यामुळे हरीश यांच्या प्रश्नाला उत्तर देताना आमची मनाई नाही असे आरबीआयने म्हटले.

दरम्यान, एसबीआय, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, अ‍ॅक्सिस बँक आणि बँक ऑफ बडोदा-या काही प्रमुख बँकांनाही हरीश यांनी व्हर्च्युअल चलनाद्वारे व्यवहार करणारे क्रिप्टो व्यापारांच्या बॅंक खात्याविषयी विचारले असता या बॅंकांनी हरीश यांना ठोस उत्तर देणे तुर्तास टाळले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button