Maharashtra GovPoliticsShivSenaShivSena-Congress-NCPपुणेपुणे महानगरपालिका

मुंबई पुणे महापालिका निवडणुकांवर संजय राउत यांचे ‘हे’ विधान

पुणे: शिवेसना नेते संजय राऊत यांनी पुणे महापालिका निवडणुकीबाबत मोठ वक्तव्य केलं आहे. राऊत यांनी पुण्यात शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र लढतील, अशी घोषणा केली आहे. राज्यातील आगामी महापालिका निवडणुकांसंदर्भात शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी महत्त्वपूर्ण विधान केलं आहे. भाजपा विरोधात महाविकास आघाडी कशा पद्धतीने या निवडणुका लढेल, आगामी पुणे महापालिका निवडणूक एकत्र लढायची हे सूत्र ठरलं आहे. ” शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र राहतील. त्यात काँग्रेसला कसं सामावून घ्यायचं, त्या बद्दल चर्चा करु” असे राज्यसभा खासदार आणि शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज पुण्यात सांगितलं.

पुणे महापालिकेत सध्या भाजप सत्तेत आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पुणे महापालिका निवडणूक एकत्रितपणे लढणार आहे. तर, काँग्रेसला सोबत घेण्याचा विचार असल्याचंही राऊत यांनी स्पष्ट केलं. “ज्या शहरात, ज्या पक्षाची ताकद आहे, त्यांनी पुढाकार घ्यावा” असे संजय राऊत म्हणाले. मुंबई, कल्याण-डोंबिवली, संभाजीनगर, नाशिकमध्ये शिवसेनेची ताकद जास्त आहे. त्या तुलनेत इतर पक्षांची ताकद कमी आहे असे संजय राऊत म्हणाले.

एकत्र लढणं हे सत्ता परिवर्तनाच्या दिशेने टाकेलेले पाऊल असंत ,राज्यात महापालिकेच्या निवडणुका एकत्र लढाव्यात, यासाठी महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये प्रयत्न सुरु आहेत. महापालिकेत ज्या पक्षाची ताकद आहे, त्या पक्षाने पुढाकार घेऊन आघाडी करावी असा विचार करण्यात येईल. निवडणुका एकत्र कशा लढता येतील यावर आम्ही अजित पवार यांच्याशी चर्चा करणार आहोत. एकत्र निवडणूक लढली तर नक्कीच त्याचा फायदा होईल. सत्ता काबीज करण्यासाठी मदत होईल अस त्यांनी वक्तव्य केले.

मनसे नेते राज ठाकरे यांच्यावर पण संजय राउतांनी टोला मारत असे बोलले की, “महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अयोध्येत गेलं पाहिजे. त्यासाठी आम्ही त्यांचं स्वागत करतो. राज ठाकरे अयोध्येत गेल्यानंतर, त्यांना तिथे शिवसेनेने केलेलं कार्य दिसेल” असे संजय राऊत म्हणाले. पुण्यात पत्रकारांनी त्यांना राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याबद्दल प्रश्न विचारला, त्यावर त्यांनी हे उत्तर दिलं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button