मनोरंजन

सायली सोमणने दिलाय ‘मिस यु मिस्टर’ च्या प्रमुख जोडीला ‘ग्लॅमरस टच’!

‘मिस यू मिस्टर’ चित्रपटामध्ये सिद्धार्थ चांदेकर आणि मृण्मयी देशपांडे या दोघांची वेशभुषा खुप कमाल दिसत आहे आणि याचं कारण म्हणजे सायली सोमण यांनी केलेली वेशभूषा. सायली यांनी या अगोदर ‘हंपी’, ‘बापजन्म’, ‘बॉईज 2, ‘पिप्सी’, ‘वर खाली दोन पाय’, ‘बाय बाय बायको’ अशा चित्रपट आणि नाटकांसाठी वेशभुषा केली असून आता त्यांनी ‘मिस यु मिस्टर’साठी वेशभूषा केली आहे.

या चित्रपटाच्या अनुभवाविषयी बोलताना सायली सोमण म्हणाल्या की ‘’मिस यु मिस्टर’ या सिनेमासाठी मृण्मयी देशपांडे आणि सिद्धार्थ चांदेकर या दोघांनी खुप मेहनत घेतली आहे. त्यांनी या चित्रपटासाठी आपले वजन कमी केले आहे. आपल्याकडे वेशभुषा करताना एखादा प्रसंग शूट करून झाला की ते सातत्य पुन्हा राखण्यासाठी तेच कपडे पुढचा प्रसंग शूट होतो त्यावेळी पुन्हा परिधान करावे लागतात. पण या दोघांच्या मापांमध्ये मला फरक जाणवला की लगेच आम्हाला त्यांचे कपडे अल्टर करावे लागतं असतं. मृण्मयीने सिनेमामध्ये आधुनिक आणि नवीन लग्न झालेल्या मुलीचे पात्र साकारले आहे. त्यामुळे तिची वेशभुषा करताना साडी आणि कुर्ता याबंरोबर अनेक प्रकारच्या कपड्यांचा समावेश केला आहे. त्यामुळे तिची ही व्यक्तिरेखा खुपच सोबर, ग्लॅमरर दिसली आहे. त्याचबरोबर सिद्धार्थ चांदेकर याची वेशभूषा करताना सिद्धार्थने परदेशी स्थलांतर झालेल्या मुलाची भुमिका साकारली आहे. त्यासाठी मी त्या प्रकारचे खुप कपडे बघितले जे त्या पात्राला शोभुन दिसतील’.

त्यापुढे म्हणाल्या की ‘मृण्मयी देशपांडे आणि सिद्धार्थ चांदेकर या दोघांची केमेस्ट्री खुप चांगली जमली आहे. या दोघांनी चित्रपटामध्ये खुप चांगली वेशभुषा कॅरी केली आहे त्यामुळे स्क्रीनवर पण या दोघांची पात्र खुप चांगली रेखीव ठळकपणे दिसली आहेत’. सायली सोमण फॅशन ट्रेंडबाबत सांगतात, ‘सध्याची जी लोकांमध्ये फॅशन आहे ती खुप कॅन्टेम्पररी आहे. येणाऱ्या काळात परत ९०च्या काळातल्या कपड्यांची स्टाइल पुन्हा ट्रेंडमध्ये येणार आहे. ग्लोबल वार्मिंगमुळे लोकांचा आता नैसर्गिक वस्त्रांकडे जास्त रस दिसणार आहे’.

‘मिस यु मिस्टर’ या चित्रपटानंतर सायली सोमण यांनी वेशभुषा केलेले ‘गर्ल्स’ आणि ‘खारी बिस्कीट’ या नावाचे दोन सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button