लोकल प्रवाश्यांसाठी खुशखबर ! रेल्वे मध्ये आता वायफाय ची सुविधा!
मुंबई: रेल्वेगाड्यांमध्ये विना अडथळा अर्थात बफरमुक्त मनोरंजनासाठी आता प्रवाशांना लोकलमध्ये वायफाय सेवा उपलब्ध होणार आहे. मार्च च्या अखेरीस मुंबई लोकलसह मेल-एक्स्प्रेसमध्ये ‘कंटेंट ऑन डिमांड’ अंतर्गत वायफाय सेवा पुरवण्याचा निर्णय ‘रेलटेल’ने घेतला आहे. यामुळे लोकलमधून प्रवास करताना प्रवाशांना मनोरंजनकाचा नवीन अनुभव घेता येणे शक्य आहे.
काहीच वर्षांपूर्वी रेल्वेने रेलवायर करून रेल्वे स्थानकांवर सामान्य जनतेसाठी तसेच प्रवाश्यांसाठी वायफाय उपलब्ध करून दिला होता. त्यावर लोकांनी खूप चांगला प्रतिसादात सुद्धा दिलेला. तर आता मार्चच्या अखेरीस लोकलमध्ये सुद्धा वायफाय देण्याचे रेल्वेने चालू केले आहे. ‘नागरिकांसाठी कॉन्टेन्ट ऑन डिमांड’ अशी त्यांचे धोरण आहे.
रेल्वेगाड्यांतून प्रवास करताना प्रवाशांना कंटेंट ऑन डिमांड अतंर्गत सर्फिंग, माहितीपट, चित्रपट, संगीत, गाणी यांचा लाभ घेता येईल. टप्याटप्याने बहुभाषक मनोरंजनाचा पर्याय देखील प्रवाशांना उपलब्ध होणार असे माहितीनुसार कळते. ही माहिती एका रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली होती.
मुंबई लोकलसह, प्रीमियम-मेल-एक्स्प्रेसमध्ये सीओडीनुसार वायफाय सेवा सुरू करण्यात येणार आहे. टप्याटप्यात ही सेवा सुरू करण्यात येणार आहे. पहिल्या टप्यात १० ते १२ लोकल गाड्यांमध्ये ही सेवा सुरू होणार आहे. याचबरोबर चेन्नई एक्स्प्रेसमध्ये देखील या प्रकारच्या सेवेचा लाभ प्रवाशांना घेता येईल.
२०२० मध्ये गुगलने असे घोषित केलेले की ते आपल्या सर्व सोयीसुविधा ज्या त्यांनी भारतातील रेल्वे स्थानकांना दिल्या आहेत ते त्या मागे घेणार आणि तसं त्यांनी केलाही पण आता मार्च पासून सुरु होणारी ही सुविधा नक्कीच आशादायी ठरेल असे बोलायला हरकत नाही. सद्य परिस्तिथीत कोरोनामुळे दुसरा लॉक डाऊन लागण्याची शक्यता आहे त्यामुळे हा उपक्रम रेल्वे कशी राबविणार यावर अजून प्रश्नचिन्ह आहे.