केडीएमसीठाणे महापालिकामनोरंजनशहर

श्रीनगर सन्मान पुरस्कार संपन्न

ठाण्यातील श्रीनगर येथे श्रीनगर समाजसेवा संघ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे यानिमित्त विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या मान्यवरांचा श्रीनगर सन्मान पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
नगरसेवक मनोज शिंदे यांच्या पुढाकाराने श्रीनगर समाजसेवा संघ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने श्रीनगर मैदानात सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे यानिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी याठिकाणी मंडळाच्या वतीने श्रीनगर परिसरात विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या मान्यवरांचा तसेच १० व १२ उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा श्रीनगर सन्मान पुरस्कार देऊन गौरवण्यात आला. यामध्ये ठाणे महापालिकेच्या वतीने ठाणे किशोर पुरस्कार मिळाल्याबद्दल  अदिती बाळा विणकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला .यावेळी नगरसेवक मनोज शिंदे,माजी नगरसेवक शैलेश शिंदे,माव्हिस ग्रुपचे अध्यक्ष विनोद शिंदे,युवा नेता योध्दान शिंदे,बाळा विणकर आदी सह मान्यवर यावेळी उपस्थित होते.
श्रीनगर समाजसेवा संघ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने साजरा होत असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचे यंदाचे ३२ वे वर्ष आहे. मंडळाच्या वतीने यंदा आपल्या सार्वजनिक उत्सवात ” त्रिपुरा राक्षसाचा वध”हा देखावा साकारण्यात आला असल्याने नागरिक हा देखावा पाहण्यासाठी गर्दी करत आहे. नागरिकांनी या उत्सवाला भेट द्यावी असे आव्हान नगरसेवक मनोज शिंदे यांच्या वतीने करण्यात आले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button