FeaturedMaharashtra Gov
महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क आयोगाच्या कोकण विभागीय आयुक्तपदी मेधा गाडगीळ
महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क आयोगाच्या कोकण विभागीय आयुक्तपदी मेधा गाडगीळ
मुंबई, दि. 13 : महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क आयोगाच्या कोकण विभागीय आयुक्तपदी सामान्य प्रशासन विभागाच्या निवृत्त अपर मुख्य सचिव श्रीमती मेधा गाडगीळ यांनी शपथ घेतली. श्रीमती गाडगीळ यांना राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त स्वाधीन क्षत्रिय यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
याप्रसंगी राज्य निवडणूक आयुक्त युपीएस मदान, महाराष्ट्र प्रदुषण नियामक मंडळाचे अध्यक्ष सुधीर श्रीवास्तव, कोकण खंडपीठाचे राज्य माहिती आयुक्त सुनील पोरवाल, सामान्य प्रशासन विभागाच्या प्रधान सचिव अंशु सिन्हा, सहसचिव माधव गोडबोले, महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क आयोगाचे उपसचिव अण्णासाहेब चव्हाण आदी उपस्थित होते.