चेन्नई कसोटी सामन्यात इंग्लंड संघानं पहिल्या डावात उभारलेल्या ५७८ धावांचा पाठलाग करताना पहिल्या डावात ३३७ धावांपर्यंत मजल मारता आली. सुंदर, पंत आणि पुजारा यांच्या फलंदाजीच्या जोरावर भारतीय संघानं सन्माजनक धावसंख्या उभारली. पहिल्या डावात २४१ धावांनी भारतीय संघा पिछाडीवर असताना इंग्लंड संघानं फॉलोऑन न देता फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, दुसऱ्या डावाच्या पहिल्याच चेंडूवर अश्विन यानं इंग्लंडला धक्का दिला.
इंग्लंडच्या दुसऱ्या डावाची सुरूवात खराब झाली. भारतीय फिरकीपटू आर अश्विनने रोरी बर्न्सला पहिल्याच चेंडूवर बाद केले. अजिंक्य रहाणेने त्याचा कॅच घेतला. पहिल्या चेंडूवर विकेट घेऊन अश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये कमाल केली. कसोटीमध्ये डावाच्या पहिल्याच चेंडूवर विकेट घेणारा तो पहिला फिरकीपटू ठरला आहे.
कसोटी क्रिकेटच्या इतिहासात १९०७ नंतर दुसऱ्यांदा असे घडले आहे की एखाद्या फिरकीपटूने पहिल्याच ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर विकेट घेतली. अश्विनच्या आधी १९०७ मध्ये दक्षिण आफ्रिकेचा फिरकीपटू बर्ट वोग्ल यांनी अशी कामगिरी केली. अश्विनने दुसऱ्या सत्रात सलामीवीर डोमिनिक सिबलीला १६ धावांवर बाद करत दुसरी विकेट घेतली. त्यानंतर इशांत शर्माने डॅन लॅरेंसला बाद करत इंग्लंडला तिसरा धक्का दिला. इशांतची कसोटीमधील ही ३०० वी विकेट ठरली.
R Ashwin is the first spinner in over 100 years to take a wicket off the first ball of an innings!
Bobby Peel, 1888
Bert Vogler, 1907
R Ashwin, 2021#INDvENG— ESPNcricinfo stats (@ESPNcric_stats) February 8, 2021
चौथ्या दिवशी भारताकडून वॉशिंग्टन सुंदरने अर्धशतक केले. कसोटीमधील त्याचे हे सलग दुसरे अर्धशतक ठरले. त्याने नाबाद ८५ धावा केल्या. सुंदरने अश्विनसह सातव्या विकेटसाठी ८० धावांची भागिदारी केली. भारताच्या पहिल्या डावात सुंदर वगळता ऋषभ पंतने ९१ धावा केल्या.
