नवीन 5000 खाटांचे कोविड सेंटर उभारण्यासाठी बीएमसीला हवी एक्सप्रेस वे जवळची जमीन; भाजपचा विरोध!
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पालिकेने 5000 खाटांचे मुंबईत नवीन कोविड सेंटर उभारण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या रुग्णालयाच्या बांधकामासाठी लागणारी जमीन संपादन करण्यासाठी एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट पालिकेने मागवले आहे.प्रस्तावित रुग्णालयासाठी पालिका सुमारे २० एकर जागा घेईल, जी वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आणि ईस्टर्न एक्सप्रेस हायवे जवळ असणे आवश्यक आहे आणि 90 फूट रुंद अशी रस्ता योजना असावी असे पालिकेने म्हटले आहे.
बीएमसीने थेट विवाद मुक्त आणि मालकीची जमीन असलेल्या जमीन मालक आणि विकसकांना आमंत्रित केले आहे. उपनगरात हे रुग्णालय उभारले जाईल. सध्या मुंबईत कोरोना रुग्णांची जी गैरसोय होत आहे ती हे रुग्णालय उभारल्यानंतर होणार नाही. आरोग्याच्या पायाभूत सुविधांची कमतरता असलेल्या मुंबई महानगराला मदत करू शकेल. असे पालिकेचे म्हणणे आहे.
“कोविड -19 ची स्थिती सुयोग्य करण्यासाठी मोठ्या आणि सुसज्ज आरोग्य सेवांच्या उपलब्धतेला अत्यंत महत्त्व आहे,” असे एका नागरी अधिका-याने सांगितले. तसेच, मुख्यमंत्री आणि महानगरपालिका आयुक्तांच्या बैठकीत 5000 खाटांचे सुसज्ज असे रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे मुंबईतील कोरोनाच्या स्थितीवर नियंत्रण मिळू शकेल असे मत बैठकीत अधिका-यांनी व्यक्त केल्याचे समजते.
तथापि, पालिकेच्या या प्रस्तावावर भाजप नेत्यांनी मुंबई पालिका प्रशासनावर निशाणा साधला आहे. “पालिकेने यापूर्वीच नेस्को, गोरेगाव, एनएससीआय डोम आणि रेस कोर्समध्ये जंबो कोविड केअर सुविधा सुरू केल्या आहेत. त्यानंतर आता नवीन 5000 खाटांच्या नवीन रूग्णालयाची काय गरज आहे, तीदेखीलह इतर सर्व सुविधा रिक्त असताना? ”असा प्रर्श्न घाटकोपरचे भाजप नेते प्रवीण छेडा यांना विचारला आहे.

