सामनातील टीकेनंतर अस्लम शेख यांनी घडवून आणली सोनू सूद – मुख्यमंत्री भेट!
मुंबई : सामनातून काल अभेनेता सोनू सूद यांच्या मजुरांसाठी केलेल्या कामावर टीका करत सूद हे भाजपाचे प्यादे असल्याची टीका सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी अग्रलेखातून केली होती. त्यानंतर कालच संध्याकाळी सोनू सूद यांनी मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी सोनू सूद एकटेच मातोश्रीवर आले नव्हते तर त्यांच्यासोबत कॉंग्रेसचे नेते अस्लम शेख प्रामुख्याने उपस्थित होते.
सोनू सूद यांच्या मातोश्री भेटीनंतर सोनू – मुख्यमंत्री भेट राज्यात चवीच्या चर्चेेचा विषय बनला आहे. सोशल मीडियावर मोठ्य़ा प्रमाणात या भेटीची चर्चा रंगली आहे. या भेटीचे फोटोही मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले हेत. त्यातच शिवसेनेच्या सोशल मीडिया ग्रूपवर या भेटीचे फोटो पोस्ट करताना फक्त मुख्यमंत्री – सूद यांचा फोटो पोस्ट केल्यानंतर अस्लम शेख सोबतचा फोटो टाकावा अशा कमेंट आल्या आहेत. तसेच, सोनू सूदला मुख्यमंत्र्यांच्या भेटीला अस्लम शेख घेऊन गेले होते असे म्हटले जात आहे.
दरम्यान, अभिनेता सोनू सूद काल (रविवार 7 जून) रात्री पावणेदहा वाजताच्या सुमारास ‘मातोश्री’वर गेला होता. काँग्रेस नेते आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्यासोबत सोनूने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. जवळपास पाऊण तास त्यांची चर्चा झाली.
आदित्य ठाकरे यांनी ट्वीट करुन याविषयी माहिती दिली. “सोनू सूद यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्री अस्लम शेख यांच्यासह भेट घेतली. अनेकांच्या साथीने अनेकांच्या मदतीसाठी एकत्र आलो आहोत. एका चांगल्या व्यक्तीला भेटलो” अशा आशयाचे ट्वीट आदित्य ठाकरे यांनी केले.

