येत्या काळात ‘एसटी’ची भाव वाढ !
मुंबई: आता लोक हे ‘न्यू नॉर्मल’ होण्याचा प्रयत्न करत आहे. कार्यालये, सरकारी व खाजगी दोन्ही चालू झाल्याने आता गर्दी ही वाढत आहे. पण लोकल चा वेळ हा मर्यादित असल्यामुळे बरेच नोकरदार वर्ग हा एस टी व खाजगी गाड्यांनी प्रवास करत आहे. पण सध्या पेट्रोल आणि डीझेल च्या वाढत्या इंधनदरामुळे सामान्य माणसाचे कंबरडे मोडले आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांच्या अध्यक्षेतेखाली मंगळवारी होणार्या बैठकीत भाडेवाढीवर अंतिम निर्णय होणार आहे.
फेब्रुवारी २०२० मध्ये डीझेल दर हे ६६ रुपये प्रती लिटर होते तेच आता २०२१ मध्ये ७९ रुपयांपर्यंत आले आहे. माहितीनुसार, सध्या एस टी महामंडळाला रोज ९ लाख लिटर डीझेल लागते. म्हणजेच डीझेल मध्ये १३ रुपयांची वाढ झाली. यामुळेच एसटीला या वर्षी रोज १ कोटी रुपयांचा अतिरिक्त भार सहन करावा लागत आहे. असे वरिष्ट अधिकारी म्हणतात.
लॉकडाऊन मुळे आधीच झालेले ५,००० कोटींचे नुकसान, डीझेल ची देणी यांना एकत्र केल्यास १,००० कोटींचे आणखी नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा तोटा आणि उत्पन्न वाढीसाठी काही काळ भाववाढ करावी लागेल असे वरिष्ट अधिकार्यांना वाटते पण ती भाववाढ किती असेल हे याचा निर्णय संचालक मंडळातील बैठकीत ठरेल. अनिल परब असे बोलतात की, वाढत्या इंधनदरामुळे हा खर्च वाढला आहे. मंगळवारी बैठकीत योग्य तो निर्णय घेण्यात येईल.

