केवळ लॉकडाऊन करून चालणार नाही कोरोना रुग्णांचा शोध घ्या; मुख्यमंत्र्यांचे आदेश
मुंबई : काही शिथिलता देऊन पून्हा लॉकडाऊन 31 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आला आहे. मात्र, लॉकडाऊन वाढवण्याच्या घोषणेसह मुख्यमंत्र्यांनी अधिका-यांना काही महत्त्वाच्ा सुचना केल्या आहेत. त्यात कोरोनाला रोखण्यासाठी केवळ लॉकडाऊन करणे महत्त्वाचे नाही तर कोरोना रुग्णांचा शोध व जास्तीत जास्त संपर्क र्शोधण्यावर भर देण्याचे आदेश बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.
मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी हे आदेश दिलेत. कोरोनाच्या संदर्भातील परिस्थितीबाबत चर्चा झाली. कोरोना रुग्णांचा शोध, त्यांचे सपर्क व त्यांना वेळीच विलगीकरण सुविधेमध्ये दाखल करणे, योग्य ते उपचार तात्काळ सुरू करणे आवश्यक आहे. सर्व पालिकांनी या दृष्टीने अतिशय काटेकोरपणे कार्यवाही करावी असे मुख्यमंत्र्यांनी बैठकीत सांगितले.
तसेच, 1 सप्टेंबरनंतर पीपीई कीट आणि मास्कचा पुरवठा बंद करण्याचे केंद्रांने सांगितले आहे. मात्र, पुढील काळात देखील सुरु ठेवावा अशी विनंती आपण पंतप्रधानांना केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

