Corona UpdatesHealth & Fitnessआरोग्यमुंबई

देशभरात दिल्या गेल्या ११ लाख कोरोनाच्या लसी!

दिल्ली: सरकारने सांगितल्यानुसार १ मार्च पासून कोरोनाच्या लसी करणाच्या तिसऱ्या टप्प्यास सुरुवात झाली. गुरुवारी, संपूर्ण भारतात ११ लाख कोरोनाच्या लसी दिल्या गेल्या आहेत असे माहितीनुसार कळते. देशभरात लसीकरणाचे प्रमाण वाढले असून गेल्या दोन दिवसांपासून केंद्र सरकारने देशातील सर्व खासगी तसेच सरकारी हॉस्पिटल्सना जास्तीत जास्त लसीकरण करण्यास आवाहन दिले आहे.

आलेल्या माहितीनुसार, भारतात जवळजवळ ११ लाख कोविड -१९ च्या लसी नागरिकांना दिल्या गेल्या होत्या. तर बुधवारी त्यांचे प्रमाण १० लाखांच्या आसपास होते. लसीकरण प्रक्रियेमध्ये वाढ होत असून लोक हे अधिकाधिक प्रमाणात उत्सुकतेने लस ही घेत आहेत. गेल्या दोन दिवसात झालेली वाढ ही बरीच मोठी आहे. पहिले, फक्त ५ लाख लसी या दररोज दिल्या जात असत आता त्यांच्यात ५०% ची अधिक वाढ झाली आहे. गुरुवारी आणि बुधवारी ज्यांचे वयवर्षे ६० च्या पुढे आणि व्याधींनी ग्रस्त असणाऱ्या नागरिकांना लसी देण्यात आल्या.

देशभरात गुरुवारी १०. ९ लाख नागरिकांनी कोरोनाच्या लसी घेतल्या. यातील ४. ९ लाख लोकांचे वय हे ६० च्या अधिक होते. तर ७५,१४७ नागरिक हे वयवर्षे ४९ ते ५९ च्या दरम्यान होते. कोरोना लसीकरणाचे प्रमाण हळू हळू वाढत असून ही दिलासादायक बातमी आहे. बुधवारीच मुंबईमध्ये १,१२१ नवीन कोरोना बाधित आढळले असून पुढील दोन दिवसात हे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे आणि आतापर्यंत एकूण ३,२८,७४० कोरोनाच्या केसेस मुंबईत झाल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button