BJPMaharashtra GovPoliticsमुंबईराजकारण

शिवसेनेच्या मंत्र्याने घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट ; राजकीय चर्चेला उधाण

मुंबई : राज्यात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढतच चालले आहे . या परिस्थितीत विरोधकांनी राज्य सरकारला धारेवर धरण्याची एकही संधी सोडली नाही . या घडामोडीदरम्यान पहिल्यांदाच शिवसेनेला नेते थेट विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस  यांच्या भेटीला पोहोचले . या भेटीसंदर्भात राजकीय वर्तुळात उलट -सुलट चर्चा रंगल्या आहेत .

शिवसेनेचे नेते अनिल परब हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे खास निकटवर्तीय आहे. परब हे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला पोहोचल्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. या भेटीदरम्यान विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे सुद्धा उपस्थित होते.

या भेटीसंदर्भात परब यांना विचारले असता , आज विधिमंडळाचे कामकाज सल्लागार समितीची बैठक होणार आहे. त्यासंदर्भात या बैठकीत चर्चा होणार असलायची माहिती त्यांनी दिली. या बैठकीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही असं परब यांनी सांगितले आहे. परंतु, गेल्या सात महिन्याच्या कालखंडात सत्ताधारी पक्षाचे नेते आणि मंत्री हे थेट विरोधी पक्षाच्या नेत्याला भेटीला आल्यामुळे अनेक तर्क -वितर्क लावले जात आहेत .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button