Festival (फेस्टिव्हल)मुंबई

गणेशोत्सवास परवानगी दिली तशी बकरी ईदलाही द्या ; कॉंग्रेसच्या नेत्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र

मुंबई : करोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्याच धर्तीवर मुस्लिम समाजाच्या बकरी ईद सणाला व त्या दिवशी देण्यात येणाऱ्या कुर्बानीला परवानगी देण्यात यावी,’ अशी मागणी कॉंग्रेसचे माजी मंत्री नसीम खान यांनी केली आहे.

बकरी ईद सणादिवशी कुर्बानी करणे मुस्लिम समाजात अनिवार्य आणि महत्त्वाचं मानलं जातं. या वर्षी कोवीडचा प्रादुर्भाव असल्याने सर्वधर्मीयांनी आपापले सण घरात बसूनच साजरे केले आहेत. अशा परिस्थितीत काही नियम-अटी ठेऊन गणपती उत्सवाला शासनाने परवानगी दिली आहे. याच धर्तीवर मुस्लिम समाजाल देखील अटी-शर्थी ठेऊन ईदला परवानगी देण्यात यावी, असे नसीम खान यांनी म्हटले आहे.

दरम्यान यंदाच्या वर्षी 1 ऑगस्ट रोजी बकरी ईद आहे. यादिवशी कुर्बानी देण्याची सूट आणि व्यवस्था करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना खान यांनी पत्र लिहिलं. या पत्राची प्रत त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तसंच मंत्री बाळासाहेब थोरात यांना देखील देण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button