पुणेकरांनो आपल्या परिसरातील माहिती जाणून घ्या ‘या’ ॲप ने !
पुणे: सध्या भारतामध्ये बरेच स्टार्ट अप्स चालू होत आहेत त्यापैकी एक आहे ते म्हणजे ३ KM ॲप . हे ॲप पुण्यातील लोकांनी खूप पसंत केले आहे. पंधरा दिवसात या ॲप चे १ लाख पेक्षा जास्त डाउनलोड झाले आहे. ग्राहकांनी सुद्धा आता नवीन डिजिटल व्यवसायांना प्रतिसात देण्यास सुरुवात केली आहे. सप्टेंबर २०२० ला हे ॲप रिलीज झाले. त्यानंतर निव्वळ ६ महिन्यांनंतर याचे १ लाखापेक्षा अधिक डाऊनलोड्स झालेत. छोटे आणि घरगुती व्यावसायिक विक्रेते यांना या ॲप द्वारे नवीन ओळख मिळाली असून त्यांचा फायदा ही खूप चांगला झाला आहे.
लॉकडाऊन मुळे पुण्यातील व्यवसाय हे ऑनलाईन झाले असून नव्या व्यवसायांनी सुद्धा या क्षेत्रात पाउल ठेवले आहे. या ॲप चे १३३ रिव्हियू मिळाले असून ४.६ अशी त्याची रेटिंग आहे. या ॲप मुळे तुम्ही तुमच्या आजुबाजूतील सर्व परिसरात तुम्ही तुमचा व्यवसाय पोचवू शकतात. याशिवाय नोकरी संदर्भात , महानगरपालिके संदर्भात, तसेच यांसारख्या सर्व बातम्या तुम्ही घरी बसल्या बसल्या मिळवू शकतात.
तसेच खरेदी विक्रीही तुम्ही या ॲप वरून करू शकतात. पुणेकरांसाठी हे ॲप म्हणजे निश्चितच व्यवसाय जोडणारे असेल. पुण्यातील स्थानिक व्यवसायांना जोडण्यासाठी तसेच नवोदित व्यवसायांना एक हक्काचा मंच देण्यासाठी हे ॲप काढले आहे.

