गझदरबंध उदंचन केंद्राचे आदित्य ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण
मुंबई : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते सांताक्रुझ येथील गझदरबंध उदंचन केंद्राचे लोकार्पण करण्यात आले. ह्या स्टेशनमध्ये प्रति सेकंद ३६ हजार लीटर पाणी बाहेर काढण्याची क्षमता असून या उदंचन केंद्रामुळे दौलत नगर, शास्त्री नगर, पी आणि टी कॉलनी, लिंकिंग रोड, बांद्रा पश्चिम, जुहू व नवली आग्रीपाडा शाळा या भागात पाणी साचणार नाही. हे पंप नाला तर साफ करतातच याशिवाय प्रवाह परत जाण्यासाठी उपयोगी पडतात तसेच आजुबाजूच्या परिसरात पाणी साचू देत नाहीत.

या सर्व पंपिंग स्टेशनमध्ये SCADA सिस्टम बसवलेली आहे ती बृहन्मुबई पालिकेच्या आपत्ती नियंत्रण कक्षाशी थेट जोडलेली आहे. २००५ ला आलेल्या पुरानंतर अशा परिस्थितीतवर मात करण्यासाठी योजना असलेले हे ६ वे पंपिंग स्टेशन असून यामुळे पुरपरिस्थितीवर नियंत्रण मिळवता येऊ शकते, असे आदित्य ठाकरे म्हणाले. या लोकार्पण सोहळ्याला महापौर विश्वनाथ महाडेश्वर, उपमहापौर हेमांगी वरळीकर आणि आमदार अमित साटम आदि उपस्थित होते.



