Travelऔरंगाबाद (संभाजी नगर) - Aurangabad

औरंगाबादहुन दिल्ली, पुणे, बंगळुरू, अहमदाबाद विमानसेवा दोन महिन्यात सुरु

औरंगाबादेतून विमानसेवा वाढवण्यासाठी दिल्लीत नागरी उड्डाण मंत्रालयांच्या सचिवांसोबत केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि विमान कंपन्यांची बैठक झाली. या बैठकीत औरंगाबाद येथून पुढील दोन महिन्यात औरंगाबाद – दिल्ली, पुणे, बंगळुरू, अहमदाबाद या मार्गावर विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे. याबद्दलचे आश्वासन दहा विमान कंपनीने औरंगाबादच्या शिष्टमंडळाला दिले. एअर एशिया, एअर इंडिया इंडिगो, स्पाईस जेट, इंडिगो या विमान कंपन्या या बैठकीत उपस्थित होत्या. पुढील दोन महिन्यात औरंगाबादहुन नवीन विमानसेवा सुरू होईल असे आश्वासन या कंपन्यांनी दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button