Travelबृहन्मुंबई महानगरपालिका - BMC

मुंबईकरांसाठी ४०० नवीन एसी बसेस नोव्हेंबरपर्यंत होणार दाखल

बेस्टचे भाडे कमी करून बेस्टने मुंबईकरांसाठी आणखीन एक आनंदाची बातमी आणली आहे. बेस्टच्या संख्येत नव्याने ४०० एसी बस सुरु करण्यात येणार आहे. दरम्यान, आधी अल्प प्रतिसाद मिळाल्याने काही मार्गावरील एसी बस थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता मात्र बेस्टच्या भाड्यात कपात करत ते पाच रुपयांपासून सुरु केला. तर एसी बसचे भाडे सहा रुपयांपासून सुरु होणार आहे.

मुंबई बेस्ट आपल्या संख्येत एसी बसेसची असलेली कमतरता भरून काढण्यासाठी ४०० मिनी एसी बसेसच्या खरेदी प्रस्तावाला बेस्ट समितीने मंजुरी दिली. ऑगस्टपर्यंत पहिल्या १०० ते २०० एसी बसेस दाखल होणार आहेत तर नोव्हेंबरपर्यंत एकूण ४०० एसी बसेसचा समावेश होईल, असे बेस्टकडून स्पष्ट करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button