Featuredलाईफस्टाईल

विद्यार्थ्यांनो असा करा ऑनलाईन अभ्यास !

कोरोनामुळे सध्या कामच नव्हे तर विद्यार्थ्यांचा अभ्यासही आता ऑनलाईन झाला आहे. तासंतास मोबाईलवर बसणे ही आता गरज बनली आहे. पहिले आया या मुलांना किती त्या मोबाईलवर खेळणार आता अभ्यासाला बस असं बोलायच्या पण आता परिस्थिती उलटी झाली आहे. आता आया लोकं मुलांच्यापाठी मोबाईल घेऊन आहेत आणि मुले मैदानी खेळ खेळण्याच्या मार्गावर. ऑनलाईन अभ्यास झाल्यामुळे मुलांना एका जागी बसून तासंतास अभ्यास हा करावा लागतोय.

वरतून हे माध्यम पण नवीन असल्याने शिक्षकांना आणि पालकांना नीट वापरता सुद्धा येत नाही आहे. आता दहावी आणि बारावीच्या परीक्षासुद्धा जवळ येत आहेत, ऑनलाईन परीक्षांमुळे पालकांमध्ये आणि विध्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. काही ट्रिक्स आहेत विद्यार्थ्यांनी वापरल्या तर नक्कीच हा ऑनलाईन अभ्यास करणे सोप्पे जाईल.

१. ऑनलाईन क्लासेस असताना नोट्स काढून ठेवा

हे एक महत्वाचे ! जेव्हा तुमचे ऑनलाईन क्लासेस चालू असतील त्यावेळी त्या त्या विषयांच्या नोट्स काढायला विसरू नका. तुम्ही घरी आहात त्यामुळे कोणत्याही मित्र किंवा मैत्रिणीवर अवलंबून राहण्यापेक्षा स्वःताचे काम स्वतः करा. म्हणजे ऐन वेळी तुमच्याकडे सर्व ‘स्टडी मटेरीअल’ असेल.

२. ग्रुप चॅट मध्ये प्रश्न विचारा.

तुम्हाला ऑनलाईन क्लासच्या वेळी काही समजले नाही तर लगेच प्रश्न करा कारण नंतर तुम्हाला तो विचारता येईलच असे नाही. कारण जरी तुम्हाला डिजिटल माध्यमे वापरता आली तरी तुमच्या शिक्षकांना ती येतातच असे नाही. त्यामुळे वेळ वाया न घालवता प्रश्न करा.

३. शिक्षकांशी कनेक्ट राहा

तुम्ही शिक्षकांना भेटू शकणार नाही हे लक्षात ठेऊन त्यांच्याशी कनेक्ट राहा जेणेकरून महत्वाचे प्रश्न, अभ्यासक्रम तुमच्याकडून सुटणार नाही. शिक्षकांशी बोलायला घाबरू नका. नाहीतर तुम्ही पाठी राहाल. या काही गोष्टी करून तुमचा अभ्यास सुटणार नाही आणि तुम्ही तुमच्या परीक्षेचा चांगला अभ्यास करू शकता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button