परिसंवादातून उलगडणार रंगभूमीच्या स्थित्यंतराचा आढावा
‘विनय आपटे प्रतिष्ठान‘ आणि ‘जागतिक मराठी नाट्यधर्मी निर्माता संघ‘च्या वतीने परिसंवादाचे आयोजन
सध्या नाट्यसृष्टी संक्रमणातून जात आहे. ५ नोव्हेंबर पासून महाराष्ट्रातली नाट्यगृहे सुरु करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केला असला तरीही अजून नाटकांचे प्रयोग सुरु झाले नाहीत ते करण्याचे प्रयत्न अजून सुरू आहेत.
कशी असेल कोव्हिड नंतरची मराठी रंगभूमी?
काय असेल कलाकारांसाठी न्यू नॉर्मल?
काय असेल निर्मात्यांचे आर्थिक गणित?
प्रेक्षक किती येतील?
…. या आणि अशा अनेक प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी दि. ७ डिसेंबर रोजी एका परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. विनय आपटे यांच्या स्मृतिदिनानिमित्त ‘विनय आपटे प्रतिष्ठान’ आणि ‘जागतिक मराठी नाट्यधर्मी निर्माता संघ’ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या परिसंवादात विजय केंकरे, वंदना गुप्ते, श्रीरंग गोडबोले, सुनील बर्वे, प्राजक्त देशमुख, अभिजित झुंजारराव सहभागी होणार आहेत.
सोमवार ७ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता, मादाम कामा हॉल, सावरकर स्मारक, दादर येथे हा परिसंवाद होईल. फक्त निमंत्रितांसाठी असणार्या या कार्यक्रमाचे FB live आपण vinay apte pratishthan या FB पेज वर पाहू शकता

