मनोरंजन

जलरंग चित्रकार प्रा. प्रल्हाद अनंत धोंड यांच्या शानदार पेन्टिंग प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद!

भारतीय जेष्ठ निसर्ग चित्रकार प्रा. प्रल्हाद अनंत धोंड यांच्या १११ व्या जयंती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या त्यांच्या १११ जलरंग चित्रांचे प्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरी मुंबई येथे मोठ्या दिमाखात ११ जून २०१९ ते १७ जून पर्यंत आयोजित करण्यात आले होते. या सात दिवसीय जलरंग चित्र प्रदर्शनास लोकांचा खूप चांगला प्रतिसाद लाभला. या प्रदर्शनास अंदाजे वीस हजारापेक्षा जास्त जलरंग चित्र प्रेमींनी भेट दिली. या प्रदर्शनात धोंड यांनी १९३१ मध्ये काढलेले पहिले चित्र व २००० मध्ये काढलेले शेवटचे चित्रही मांडण्यात आले होते. यामध्ये मुंबईतील फोर्ट, चर्चगेट आदी दृश्ये, मावळतीचा सूर्य, समुद्रकिनारी मार्ग शोधत चालणारा अवलिया, कोकणाचा नयनरम्य निसर्ग, फेसाळणाऱ्या लाटा, मासेमारी करणारे कोळी, आदी चित्रांचा समावेश होता. या जलरंग चित्र प्रदर्शनास प्रख्यात व्यंग-चित्रकार आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे, भाजपा अध्यक्ष अ‍ॅड. आशिष शेलार, नाटक-चित्रपट-मालिका कलाकार अरुण नलावडे आदी मान्यवरांनी हजेरी लावली होती. तसेच जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सचे माजी अधिष्ठाता, जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सचे स्टुडन्ट, इतर आर्ट्स कॉलेजेसचे स्टुडन्टस, चित्रकलेच्या क्लासच्या यंग टीचरने ही आपल्या स्टुडंटसह येथे भेट दिली. मुंबईच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील कलाप्रेमी, टीचर आणि स्टुडंटस यांनी या प्रदर्शनाला भेट दिली त्यात मालवण कोकण, पुणे, नाशिक, कोल्हापूर, नागपूर इत्यादी ठिकाणाहुनही जलरंग चित्र प्रदर्शन पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती.

११ नोव्हेंबर १९०८ रोजी प्रा. प्रल्हाद अनंत धोंड यांचा जन्म रत्नागिरी येथे झाला. त्यांनी १९३४ साली कला पदविका प्राप्त केली व १९३७ साली झालेल्या आर्ट मास्टर परीक्षेत प्रथम क्रमांक पटकावला त्यानंतर त्यांनी मुंबईतील सर जे जे स्कूल ऑफ आर्टसचे डीन व महाराष्ट्र राज्य सरकारचे कला संचालक म्हणून काम पाहिले. त्यांच्या या अनोख्या शैलीतील चित्रे भारतातील अनेक कला दालनांतून, संग्रहालयांतून, विद्यापीठांतून संग्रहीत करण्यात आलेली आहेत. तसेच पश्चिम जर्मनी, अमेरिका, दक्षिण आफ्रिका, पूर्व आफ्रिका, रशिया आदि देशांतील नामवंत संस्था, विविध क्षेत्रांतील मान्यवर उच्च पदस्थ आणि कला रसिकांच्या संग्रहांत त्यांची चित्रे आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button