कुळगाव बदलापूरठाणे महापालिकामीरा भाईंदरलाईफस्टाईल

कशिश​ पार्क​ ​परिसरातील सुविधा भुखंडावर जिल्हा रुग्णालय स्थलांतरीत करुन, स्थानिक नागरीकांना पूर्वभूत हक्कापासून वंचित करु नका​

कशिश पार्क येथील सुविधा भूखंडावर प्रस्तावित असलेल्या जिल्हा रुग्णालयाच्या स्थलांतरास स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार तसेच या भागातील प्रस्तावित मेट्रोच्या कामाचा विचार करून ठामपाचे शिक्षण विभागाचे सभापती विकास रेपाळे यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. तसेच या अनुषंगाने त्यांनी तातडीने कशिश पार्क येथील सुविधा भूखंडावर प्रस्तावित असलेल्या जिल्हा रुग्णालयाच्या स्थलांतराबाबत मा. ना. श्री. एकनाथ शिंदे साहेब, मंत्री, सार्वजनिक बांधकाम (उपक्रम) विभाग व मा. डॉ. दिपक सावंत साहेब, मंत्री, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण महाराष्ट्र राज्य, मुंबई यांना लेखी पत्र पाठवून वस्तुस्थिती नमूद केली आहे.

वरील सुविधा भूखंडावर सद्यस्थितीत बांधण्यात आलेली इमारत ही रुग्णालयाला आवश्यक असलेल्या बांधणीनुसार बांधण्यात आली नसल्याची बाबही लेखी पत्राद्वारे निदर्शनास आणून दिली. तसेच या रुग्णालयाकरिता आरक्षित असलेल्या जागेवरच रुग्णालय विकसित करण्याच्या दृष्टीने विचार करणे आवश्यक असल्याचे नमूद केले आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातील मुंब्रा परिसरात रुग्णालयाच्या दृष्टीने आवश्यक असलेली इमारत बांधण्यात आली असून, या जागेचा विचार जिल्हा रुग्णालयासाठी करता येईल असेही विकास रेपाळे यांनी सुचविले आहे.

कशिश पार्क येथे असलेल्या सुविधा भूखंडावर जिल्हा रुग्णालय झाल्यास तेथील नागरिक पूर्वभूत हक्कानुसार प्राप्त होणाऱ्या सुविधांपासून वंचित होतील. तसेच कशिश पार्क येथील इमारत रुग्णालयाच्या दृष्टीने अयोग्य असल्याची महत्त्वाची बाब एका पत्राद्वारे निदर्शनास आणून दिली असून त्यास स्थानिक नागरिकांचा तीव्र विरोध असल्याचेही नमूद केले आहे.

वरील कारणास्तव व स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार आणि या भागातील भविष्यातील प्रस्तावित मेट्रोच्या कामाचा विचार करून कशिश पार्क येथील सुविधा भूखंडावर प्रस्तावित असलेल्या जिल्हा रुग्णालयाच्या स्थलांतरास ठा. म. पा. चे शिक्षक समितीचे सभापती विकास रेपाळे यांनी तीव्र विरोध दर्शविला असून, जिल्हा रुग्णालय या भूखंडावर स्थलांतरित करू नये अशा प्रकारची लेखी पत्राद्वारे मागणी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button