राजकारण
‘अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेणार नाही’ – राहुल गांधी
नुकत्याच झालेल्या काँग्रेस खासदारांच्या बैठकीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी अध्यक्ष पदाचा राजीनामा मागे घेण्याची मागणी करण्यात आली. काँग्रेसच्या अध्यक्षपदी राहायचाच नाही, असे राहुल गांधी यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीतील पराभव हा केवळ तुमचा एकट्याचा पराभव नसून ही पक्षाची सामूहिक जबाबदारी असल्याचं सांगत खासदार शशी थरूर आणि मनीष तिवारी यांनी राहुल यांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला. पण राहुल गांधी यांनी पक्षाच्या पराभवाची जबाबदारी आपली असल्याच म्हणत काँग्रेसच्या अध्यक्षपदी राहणार नसल्याच स्पष्ट केलं.
