Monsoonमुंबई

मुंबईत पावसाची सलग दुसऱ्या दिवशी देखील जोरदार हजेरी

मुंबई-ठाणेकरांकडे पाठ फिरवलेल्या पावसाने आज सलग दुसऱ्या दिवशी देखील जोरदार हजेरी लावली. त्यामुळे शहरातल्या अनेक ठिकाणी पाणी भरले. पावसाचा फटका मुंबई लोकलला देखील लागला. मुंबईकरांची लाईफलाईन आज १० ते १५ मिनट उशिराने धावत आहे. मुंबईत सहा ठिकाणी घरांची पडझड झाली. त्यात तीनजण जखमी झाले असून दोघांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात आलं. पावसाचे पाणी रस्त्यावर जमायला लागल्याने रस्त्यावरील वाहतूक देखील मंदावली. पालघर जिल्ह्यातील डहाणू, विक्रमगडमध्ये देखील पावसाने जोरदार हजेरी लावली. वसई आणि विरार परिसरातील सखल भागात पाणी साचल्याने स्थानिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. नालासोपाऱ्यातील सेंट्रल पार्क आणि तुलिंज येथेही पाणी भरल्याने अनेकांना घराबाहेर पडणं कठीण झालं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button