राजकारण

दिल्ली दौऱ्यात राज यांनी घेतली सोनियांची भेट

दिल्ली दौऱ्यावर असलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. राज आणि सोनिया यांची ही पहिलीच अधिकृत भेट आहे. या भेटीत राज यांनी ईव्हीएम आणि महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांबाबत सोनिया यांच्याशी चर्चा केल्याचे सूत्रांनी सांगितले.

सोनिया गांधींच्या भेटीला जाण्याआधी राज ठाकरेंनी सकाळी निवडणूक आयुक्तांची भेट घेतली. ‘ईव्हीएमध्ये मोठा घोळ झाला आहे, जे जिंकले आहेत त्यांना जिंकून कसे आले याबाबत शंका आहे. मतदाराना त्यांनी कुणाला मतदान केलं ते समजलं पाहिजे. मी त्याच संदर्भात निवडणूक आयुक्तांची भेट घेतली. निवडणूक आयोगाकडून मला शून्य अपेक्षा आहे. कारण त्यांच्याशी बोलताना त्यांच्या चेहऱ्यावर जे काही हावभाव होते त्यावरूनच हे लक्षात येत होतं की त्यांना आमच्या बोलण्यात काहीही स्वारस्य नाही’ असे राज ठाकरेंनी म्हटलं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button