‘ या ‘ गोष्टी केल्याने पचनसंस्था सुधारते !
सध्य परिस्थितीत आपण घरूनच काम करत आहोत. यामुळे झालय अस की शरीराला व्यायाम नाही आहे आणि बसून खाल्याने पचन ही नीट होत नाहीये. पचनसंस्था सुधारण्यासाठी बरेच लोक औषध आणि गोळ्या खातात पण काही परिणाम होत नाही उलट आणखी काही दुष्परिणाम होतो. पण पचन संस्था सुधरवण्यासाठी तुम्हाला गोळ्या खाण्याची गरज नाहीये तर फक्त काही सवयी अंगात आणा. खाण्यात थोडेफार बदल करा म्हणजे तुमची पचन संस्था स्वतःहूनच सुधारेल.
१. आहार बदला
सध्या परिस्थिती घरी असल्यामुळे आपण बाहेरच तसेच घरी आहोत म्हणून मसालेदार पदार्थ खूप खातो. यामुळे होते असे की तेलकट, मसालेदार पदार्थामध्ये असलेल्या तेलामुळे आहाराचे नीट पचन होत नाही व आंबट ढेकर यायला सुरुवात होते. त्यामुळे हे पदार्थ खाण्याचे सोडा किंवा कमी करा आणि सात्विक आहार कडे लक्ष द्या, याचा अर्थ अगदी बेचव अन्न खाणे असा होत नाही तर ज्याच्यामध्ये सर्व पौष्टिक घटक असतील असे अन्न खाणे. तुम्ही सोशल मीडिया वरून वेगवेगळ्या हेल्दी रेसिपीस पण बघून बनवू शकतात.
२. फायबर युक्त अन्न खा
फायबर हे झालेल्या अन्नाला पचवायचे काम करते. किंवा असे म्हणता येईल की ते पचन संस्था चांगली करायला मदत करते. त्यामुळे आहारात फायबरयुक्त पदार्थ जसे की पालेभाज्या, हिरव्या भाज्या, सॅलड्स , कोबी, ओट्स असे पदार्थ आणायला सुरुवात करा. म्हणजेच अन्न पचायला वेळ लागणार नाही.
३. भरपूर पाणी प्या
वरील दिलेल्या वाक्याचा अर्थ असा नव्हे की ७ ते ८ लिटर पाणी पिणे पण असा आहे की जेव्हा तहान लागेल तेव्हा पाणी प्या किंवा काही खाल्ले के त्यानंतर पाणी प्या कारण पाणी पिल्याने जे खाल्लेले अन्न आहे ते पचायला हलके होते . तसेच पाण्यामुळे शरीरात ओलावा राहतो व मल बाहेर पडण्यास अडचण येत नाही.
४. स्ट्रेस कमी, व्यायाम जास्त
मानसिक ताण जर असेल तरी कितीही अन्नामध्ये बदल केले तरी शरीराला त्रास हा होतो. त्यामुळे मानसिक ताण याचे नियोजन करा व जमेल तेव्हा व्यायाम करा. मग अगदी दिवसातून साधा सूर्यनमस्कार जरी घातला तरी चालेल. ताणाला नियंत्रीत आण्याचे काम ध्यानधारणा करते त्यामुळे दिवसातून कमीतकमी ५ मिनिटे तरी मेडिटेशन करा.