आरोग्य

एमबीबीएस कंत्राटी डॉक्टरांप्रमाणे बीएएमएस डॉक्टरांनाही मिळणार ‘समान काम – समान वेतन’, आमदार निरंजन डावखरे यांच्या मागणीला यश

राज्य सरकारने कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या (वर्ग अ) मानधनात वाढ केली आहे. त्यात एमबीबीएस डॉक्टरांचा उल्लेख आहे. मात्र, बीएएमएस डॉक्टरांचा उल्लेख केला नसल्याने कोकण पदवीधर मतदार संघाचे आमदार निरंजन डावखरे यांनी ‘समान काम – समान वेतन’ या तत्वावर एमबीबीएस डॉक्टारांप्रमाणे बीएएमएस डॉक्टरांना वेतन मिळावे, अशी मागणी सार्वजनिक आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. याची गांभीर्याने दखल घेऊन सार्वजनिक आरोग्य विभागाने शासन परिपत्रकानुसार आदिवासी व दुर्गम भागात काम करणाऱ्या डॉक्टरांना ४५ हजार रूपये, तर इतर भागात काम करणाऱ्या डॉक्टरांना ४० हजार रूपये असे मानधन लागू केले आहे. यामुळे आमदार निरंजन डावखरे यांच्या मागणीला यश मिळाले असून बीएएमएस डॉक्टरांनी त्यांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button