Travelलाईफस्टाईल

वाहनचालक नियमांचे पालन करतील तर कोणालाही दंड होणारच नाही : गडकरी

पेट्रोल-डिझेलची वाहने बंद करण्याचाही सरकारचा बिलकूल इरादा नसल्याचेही सांगून, सारे वाहनचालक वाहतूक नियमांचे पालन करतील व कोणालाही दंड होणारच नाही अशी वेळ यावी, हीच सरकारची इच्छा आहे, अशीही पुस्ती त्यांनी जोडली.

जगातील सर्वाधिक अपघातांचा व वर्षाला दीड लाख अपघाती मृत्यूंचा देश, असा डाग लागलेल्या भारतात एक सप्टेंबरपासून नवा कायदा लागू झाला.

नव्या कायद्यातील काही तरतुदींच्या विरोधात दिल्लीतील ऑटो रिक्षा व वाहनचालक संघटनांनी येत्या नऊ सप्टेंबरला “दिल्ली बंद’च्या हालचालीही सुरू केल्या आहेत. “जीव अनमोल आहे की दंड जास्त आहे,’ अशा जनजागृतीचे परिणाम मर्यादित दिसत आहेत.

मध्य प्रदेश, गुजरातसह काही राज्यांनी याच्या तत्काळ अंमलबजावणीस नकार दिला आहे. महाराष्ट्रानेही दंडाच्या अंमलबजावणीबाबत सावध धोरण स्वीकारले आहे. विशेषतः उत्तर भारतात दंडाबाबत प्रचंड रोष व्यक्त होत आहे.

या पार्श्‍वभूमीवर गडकरी यांचे ताजे वक्तव्य महत्त्वाचे मानले जाते. बेशिस्त वाहनचालकांसाठी दंडाची रक्कम वाढविण्यात येणार, ही केवळ अफवा असल्याचेही त्यांच्या खुलाशातून स्पष्ट झाले आहे. पेट्रोल व डिझेलवरील वाहने बंद करणार असल्याची अफवा आहे, असे ते म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button