गॅझेट्स

तब्बल ९ तास फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप अन् इंस्टाग्रामचे सर्व्हर डाऊन

सोशल मीडिया हे संवाद साधण्याचं सगळ्यात सोपे आणि प्रभावी माध्यम आहे. म्हणूनच फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप अन् इंस्टाग्रामचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. पण ३ जुलैला व्हॉट्सअ‍ॅप, इन्स्टाग्राम आणि फेसबुक जगभरात डाऊन झाले आणि सर्व युजर्सची तारांबळ उडाली. व्हॉट्सअ‍ॅपवर टाकले जाणारे फोटो, व्हिडीओ स्टेटस कोणालाच दिसत नव्हते. तसेच कोणाला पाठवले असता ते डाउनलोड देखील होत नव्हते. सुरुवातीला प्रत्येकाने नेटवर्क प्रॉब्लेम समजून याकडे दुर्लक्षित केले. मात्र फेसबुक आणि इंस्टाग्रामवर देखील सारखेच चित्र पाहायला मिळाल्यावर युजर्सने ट्विटर मार्फत आपला संताप व्यक्त केला. तब्बल 9 तासांनंतर सोशल मीडिया पूर्ववत झाला.

फेसबुक युजर्सना त्रास झाल्याबद्दल फेसबुकने युजर्सची माफी मागितली. ‘व्यवसाय, नोकरी आणि इतर क्षेत्रातील लोकांना फोटो, व्हिडीओ, फाईल्स पाठवताना आमच्या प्लॅटफॉर्मवर अनेक समस्यांचा सामना करावा लागला. ही समस्या सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो. त्यानंतर आता ही समस्या सोडवण्यात आली आहे. युजर्सना यामुळे जो त्रास सहन करावा लागला त्यासाठी आम्ही माफी मागतो.’ असे म्हणत फेसबुकने दिलगिरी व्यक्त केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button