देशात कोरोनाबाधितांची संख्या ६२ लाखांवर
गेल्या काही दिवसांपासून काही अंशी कमी झालेली करोनाबाधितांची रुग्णसंख्या पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. देशातील करोनाबाधितांची संख्या ६२ लाखांवर गेली आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये देशात ८० हजार ७७२ नव्या करोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर १ हजार १७९ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
गेल्या चोवीस तासांत देशात ८० हजार ४७२ नव्या करोनाबाधितांची नोंद करण्यात आली असून करोनाबाधितांची एकूण संख्या आता ६२ लाख २५ हजार ७६४ वर पोहोचली आहे. दरम्यान, आतापर्यंत ५१ लाख ८७ हजार ८२६ जणांनी करोनावर मात केली आहे. तर दुसरीकडे देशात ९ लाख ४० हजार ४४१ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहे. आतापर्यंत करोनामुळे देशात ९७ हजार ४९७ रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
याव्यतिरिक्त देशात मोठ्या प्रमाणात करोना चाचण्याही वाढवण्यात आल्या आहेत. मंगळवारी देशात एकूण १० लाख ८६ हजार ६८८ करोना चाचण्या करण्यात आल्या. आतापर्यंत देशभरात ७ कोटी ४१ लाख ९६ हजार ७२९ करोना चाचण्या करण्यात आल्याची माहिती आयसीएमआरकडून देण्यात आली.
दरम्यान, कोविड -१ ९ लसीच्या तिसर्या टप्प्यातील चाचणीवर बोलताना उत्तर प्रदेशचे आरोग्यमंत्री जय प्रताप सिंह यांनी सांगितले की, भारत बायोटेकच्या लस चाचणीत लखनौ आणि गोरखपूरमधील प्रत्येकी १,५०० लोक समाविष्ट असतील. ते म्हणाले, भारत बायोटेक द्वारा विकसित केलेल्या कोविड -१९च्या लस तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांमध्ये लखनौ आणि गोरखपूरमधील प्रत्येकी १,५०० लोकांचा समावेश असेल.
