आरोग्यक्राईम न्यूज

नायर हॉस्पिटल घोटाळा उघड! तीन मृत कर्मचाऱ्यांना दाखवले जिवंत

मुंबई: डॉक्टरच्या आत्महत्येमुळे चर्चेत आलेले मुंबई सेन्ट्रल येथील नायर हॉस्पिटल पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. या हॉस्पिटलच्या स्थापना विभागाने पेन्शन घोटाळा केल्याचे समोर आले आहे. तीन मृत कर्मचारी कंकू रावलीया, निर्मला माघाडे आणि शांताबाई जाधव ह्यांना जिवंत दाखवून त्यांचे पेन्शन तसेच कुटुंब निवृत्ती वेतन लाटण्यात आले. सुमारे १० लाखांची रक्कम लुबाडण्यात आली असे चौकशी दरम्यान उघड झाले आहे. हे कळताच रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी आग्रीपाडा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला.

मुंबई महापालिकेच्या कोषागार कार्यालयातून नायर रुग्णालयातील आस्थापना विभागात कार्यरत असलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांसह आस्थापना विभागातील चौघांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात आली. मृत व्यक्तिंच्या नावावरून आपल्या कार्यालयातून पेन्शनचा दावा कसा मंजूर करण्यात आला? याबाबत या नोटिशीमधून विचारणा करण्यात आली.

ऑक्टोबर मध्ये आलेल्या या नोटिशीला अधिकाऱ्यांनी उत्तर देताना या प्रकरणाची विभागीय चौकशी सुरु केली. त्यावेळी आस्थापना विभागातील कारकून प्रसाद गोसावी ऑगस्ट महिन्यात कंकू रावलीया यांचा सेवानिवृत्तीचा अर्ज घेऊन आला असे लक्षात आले. मास्क लावलेली एक महिला प्रसादसोबत यावेळी आली होती. प्रसादने तिची ओळख रावलीया यांची सून असल्याची करून दिली होती. त्यांनी सादर केलेल्या अर्जावर बँकेचा स्टॅम्प आणि मॅनेजरची सही असलेला हयातीचा दाखला तसेच इतर कागदपत्रांची पडताळणी केली असता ती खोटी असल्याचे लक्षात आले. आपण अडकले जाऊ या भीतीने गोसावी याने आपली चूक मान्य केली आणि तीन मृत कर्मचाऱ्यांच्या नावाने लुबाडलेले ९ लाख ९१ हजार ७०० रुपये महापालिका को ऑपरेटिव्ह बँकेत जमा केले.

कंकू प्रमाणेच आणखी दोन कर्मचाऱ्यांच्या बाबतीत असे घडल्याचे समोर आले. या प्रकरणात अजून कोण सामील आहे याचा तपास पोलीस करत आहेत तसेच अजून किती लोकांच्या नावाने अशाप्रकारे शासनाची फसवणूक करण्यात आली आहे का याचाही शोध पोलीस घेत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button