बिहार विधानसभा निवडणुक तोंडावर आली आहे. यासाठी प्रत्येक सज्ज होत आहे. आता राष्ट्रवादी कॉंग्रेसने स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये महाराष्ट्रातून स्वत: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार सुनील तटकरे खासदार सुप्रिया सुळे तसंच अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यासह अनेक नेत्यांचा समावेश आहे. राष्ट्रवादीने जाहीर केलेल्या या यादीतील सर्व नेते निवडणुकांच्या प्रचारसभेत सहभागी होणार आहे. राष्ट्रवादीने जाहीर केलेल्या स्टार प्रचारकांच्या यादीत एकूण ३९ नेत्यांची नावे आहेत. बिहार विधानसभेचा पहिला टप्पा २८ ऑक्टोबरला पार पडणार आहे. येत्या काही दिवसांतच प्रचारसभांची रणधुमाळी सुरु होणार आहे.
राष्ट्रवादीने जाहीर केलेल्या स्टार प्रचारकांच्या यादीत एकूण ३९ नेत्यांची नावे आहेत. बिहार विधानसभेचा पहिला टप्पा २८ ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे. येत्या काही दिवसांतच प्रचारसभांची रणधुमाळी सुरु होणार आहे.
- शरद पवार
- प्रफुल्ल पटेल
- सुनील तटकरे
- के. के. शर्मा
- सुप्रिया सुळे
- नरेंद्र वर्मा
- राजीव कुमार झा
- राजेंद्र जैन
- सच्छिदानंद सिंग
- ब्रिजमोहन श्रीवास्तव
- के.जे.जोसेमन
- डॉ. फौजिया खान
- धीरज शर्मा
- सोनिया दुहान
- शब्बीर अहमद विद्रोही
- पुष्पेंद्र मलिक
- नबाव मलिक
- सीमा मलिकविरेंद्र सिंग
- गोविंदभाई परमार
- चौधरी वेद पाल
- उमा शंकर यादव
- एस.पी. शर्मा
- मुरली मनोहर पांडे
- राहत कादरी
- जितेंद्र पासवान
- ललिता सिंग
- संजय केशरी
- इश्तिक आलम
- अकबर अली
- मनोज जैस्वाल
- खुश्रो आफ्रिदी
- ब्रिज बिहारी मिश्रा
- शकील अहमद
- अझहर आलम
- इंदु सिंग
- चांद बाबू रहमान
- चंद्रेश कुमार
- चंद्रशेखर सिंग
- विरेंद्र सिंग
बिहार विधानसभेसाठी एकूण तीन टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात २८ ऑक्टोबर, दुसऱ्या टप्प्यात३ नोव्हेंबर आणि तिसऱ्या टप्प्यात ७ नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून निवडणुकीचा निकाल १० नोव्हेंबरला लागणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील आरोरा यांनी ही घोषणा केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतदारांना मतदान करण्यासाठी एका तासाचा अधिक वेळ देण्यात आलेला आहे. तसेच, या निवडणूकीत कोरोना पॉझिटीव्ह असलेल्यांना मतदान करण्यासाठी खास सोय करण्यात आली आहे.
