Nandurbar

नंदुरबारमध्ये खासगी बस ४० फूट खोल दरीत कोसळली, ४ जणांचा मृत्यू

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातून जाणाऱ्या धुळे-सूरत राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी पहाटे मोठा अपघात झाला आहे. प्रवाशांनी भरलेली खासगी बस दरीत कोसळून मोठी दुर्घटना घडली. कोंडाईबारी घाटातील दर्ग्याजवळ पुलावरून जात असताना ३० ते ४० फूट खोल दरीत ही खासगी बस कोसळून मोठा अपघात झाला आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

बस दरीत कोसळल्यामुळे या अपघातात ४ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर ३५ प्रवासी गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान पोलिसांनी या ३५ प्रवाशांना बाहेर काढलं असून तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

धुळे सूरत राष्ट्रीय महामार्गावर कोंडाईबारी घाटात पहाटेच्या सुमारास अचानक बस दरीत कोसळली. हा अपघात नेमका कशामुळे झाला? बस चालकाचं नियंत्रण सुटलं की आणखीन काही याचा शोध सध्या पोलिसांकडून सुरू आहे. जळगावहून सूरतच्या दिशेनं ही बस जात असताना हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या रुग्णांना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button